कोदामेंढी :- दरवर्षीप्रमाणे यंदाही पं.स.मौदा, जि प तारसा -चाचेर क्षेत्र, पं. स .चाचेर गण अंतर्गत येणाऱ्या ग्रामपंचायतचे येसंबा येथे आज दि. 26 नोव्हेंबर मंगळवार ला बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन उपसरपंच धनराज हारोडे यांच्या हस्ते करून संविधानाचे वाचणं करून संविधान दिन साजरा करण्यात आला.याप्रसंगी शुभम काटोले,मिरा हारोडे,वैभव देवळीकर, पोलिस पाटील नरेंद्र राऊत, विठ्ठलराव महाल्ले, अंगणवाडी सेविका माया चकोले, आशा वर्कर सुषमा गजभिये, मदतनीस कांता गजभिये, निधी मेश्राम, आणि अंगणवाडीचे विद्यार्थी उपस्थितीत होते.