मोदींच्या ४०० पार अभियानात मतदारसंघ देणार योगदान, अल्पावधीत सर्वच स्तरावर महायुतीची सरशी

यवतमाळ :- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अबकी बार ४०० पार अभियानात यवतमाळ – वाशिम मतदारसंघ योगदान देणार आहे. अल्पावधीत महायुतीच्या उमेदवार राजश्री पाटील यांना सर्व घटकांमधुन मिळणारा उत्स्फुर्त प्रतिसाद महायुतीच्या विजयाची खात्री देत आहे. सुरुवातीला एकतर्फी त्यानंतर अटीतटीची अशी वाटणारी यवतमाळ – वाशिम लोकसभेच्या निवडणुकीत महायुतीच्या उमेदवार राजश्री पाटील यांनी आघाडी घेतली आहे. सिने अभिनेता गोविंदा यांचा रोडशो, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रचारसभा, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेली ग्वाही, तरुणाईची साथ आणि महायुतीच्या स्थानिक नेत्यांनी घेतलेल्या सभा यामुळे शेवटच्या टप्प्यात महायुतीच्या उमेदवार राजश्री पाटील यांचे पारडे जड झाले असुन मोदींच्या अभियानात मतदारसंघाचे मौलीक योगदान असणार आहे.

उमेदवारी जाहीर होण्यासाठी लागलेल्या विलंबाने महायुतीच्या उमेदवार राजश्री हेमंत पाटील (महल्ले) ह्या लोकसभा मतदारसंघात दुरवर पोहोचतील का ? अशा शंका व्यक्त होवू लागल्या होत्या. मात्र, विरोधकांच्या या प्रचाराला आपल्या कार्याने उत्तर देण्याचा स्वभाव असणारया महायुतीच्या उमेदवार राजश्री पाटील यांनी संपुर्ण मतदारसंघ पिंजून काढला. प्रचारसभा, कॉर्नर बैठका, प्रत्यक्ष भेटी यामुळे राजश्री पाटील यांनी मतदारांना आपलेसे केले आहे

राजश्री पाटील यांनी त्यांच्या संस्थेंच्या माध्यमातुन ५० हजार महीलांना आर्थिक सुबत्ता प्राप्त करुन दिली. बचत गटांच्या महीलांना सुलभरीत्या उद्योगांसाठी कर्ज उपलब्ध करुन दिले. खंबीर नेतृत्व, अमोघ वक्तृत्व आणि वाखानण्यासाखे कतृत्व यामुळे राजश्री पाटील जनमानसाला भावल्या आहेत. निती आयोगाने राजश्री पाटील यांच्या कार्याची दखल घेतली आहे. राजश्री पाटील निती आयोगाने देशातुन निवडलेल्या दहा प्रभावी महीलांपैकी एक आहेत. प्रचारात त्यांनी शेतकरयांच्या बांधावरचे प्रश्न मांडत असतांना नवयुवक मतदाराच्या समस्येलाही हात घेतला. आपल्या विरोधकाच्या टिकेला उत्तर देत असतांना त्यांनी आपल्या विकासाचा अजेंडाही मांडला. आपल्या भाषणात विकासाच्या मुद्यावर बोलतांना त्यांनी आपला जाहीरनामा नव्हे तर वचननामा जनतेसमोर मांडला.

मतदारसंघात सोयाबीन व हळदीवर आधारीत संशोधनकेंद्र, शासकीय कृषी महाविद्यालय, तालुका मुख्यालयी गोशाळा, उत्तर दक्षिण दिशेला जोडणारा तिसरा पर्यायी मार्ग असलेला वाशिम-बडनेरा हा रेल्वेमार्ग, वाशिम-आदिलाबाद, वाशिम-जालना हा रेल्वेमार्ग अस्तित्वात यावा या दृष्टीने प्रयत्न करणार. मतदारसंघातील प्रत्येक विधानसभा क्षेत्रात ई-क्लास जमिनीवर १०० बाय १०० मिटरचे ६०० शेततलाव बांधणार. त्यामुळे लोकसभा मतदारसंघात १८०० कोटी लिटर पाण्याचा संचय होईल. एमआयडीसीमध्ये सोयाबीनवर आधारीत सरकारी प्रकल्प अथवा दिग्गज कंपनीचा प्रकल्प वाशिम एमआयडीसीमध्ये आणण्यासाठी प्रयत्न करेल तालुक्याच्या मुख्यालयी फिरते मोफत दवाखाने उपलब्ध करुन देण्यात येईल. एवढेच नव्हे तर तालुक्याच्या मुख्यालयी प्रत्येक दोन रुग्णवाहीका तर विधानसभा मतदारसंघात एक कार्डीयाक रुग्णवाहीका ना नफा ना तोटा तत्वावर उपलब्ध करुन देण्यासाठी पुढाकार घेणार. सर्व नगर परिषद अंतर्गत सर्व ठिकाणी महिलांसाठी सुलभ शौचालयाची निर्मिती तथा महिलांसाठी कौशल्यावर आधारीत प्रशिक्षणाची सोय करण्यात येईल. न.प. व्यापारी संकुलामधील गाळ्यांमध्ये

महिलांना ५० टक्के भाड्यात सुट तथा यापुढे निर्माण होणार्‍या न.प. च्या प्रत्येक व्यापारी संकुलामध्ये महिलांसाठी २० टक्के व्यापारी गाळे राखीव. दिव्यांगांना स्वावलंबी करण्यासाठी किमान कौशल्यावर आधारीत त्यांना प्रशिक्षण देण्यात येईल. दिव्यांगांसाठी सर्व नगर परिषद अंतर्गत विशेष सुलभ शौचालयाची स्थापना करण्यात येवून त्यांच्यासाठी व्यापारी संकुलाचे निर्माण करण्यासाठी पुढाकार घेण्यात येईल असा वचननामा राजश्री पाटील यांनी दिला आहे.

एकंदरीत महायुतीच्या उमेदवार राजश्री पाटील यांचा प्रचाराचा झंजावात, वाढती लोकप्रियता, जनसंपर्क याच्या जोडीला महायुतीचे सर्व नेते यांनी सुरु केलेली जोरकस मोर्चे बांधणी. नवमतदारांची साथ, महीला मंडळाचे प्रेम, युवकांमधील जोश, सर्वसामान्य कष्टकरी, शेतकरी मतदारांचा आशिर्वाद यामुळे यवतमाळ – वाशिम मतदारसंघावर शिवसेनेचा धणुष्यबान गारुड घालणार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या , “अबकी बार ४०० पार अभियानात मतदार संघाचे मौलिक योगदान देणार यात दुमत नाही.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

‘बहुमताचा वापर करून भाजपाने देशाचा विकास केला '! काँग्रेसी अपप्रचाराला बळी पडू नका - अकोला येथील सभेत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे आवाहन

Wed Apr 24 , 2024
अकोला :- भाजपाला 400 हून अधिक जागांवर विजय मिळाला तर संविधान बदलणार, आरक्षण रद्द करणार, असा अपप्रचार काँग्रेसकडून केला जात आहे. या अपप्रचाराला बळी पडू नका, गेल्या दहा वर्षांत मोदी सरकारने आरक्षण रद्द केले नाही, तर बहुमताचा वापर करून 370 कलम रद्द केले, दहशतवाद संपविला, तिहेरी तलाक प्रथा रद्द केली आणि सीएए कायदा जारी करण्यासाठी बहुमताचा उपयोग केला. जोपर्यंत देशात […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com