समृद्धीवर सातत्याने होणारे अपघात हा कळीचा मुद्दा ;वेगमर्यादेवर सरकारकडून कठोर नियमांची गरज – जयंत पाटील

– दुर्दैवी अपघातातील मृत व्यक्तींच्या कुटुंबियांच्या दुःखात संपूर्ण राष्ट्रवादी परिवार सहभागी;जयंत पाटलांनी वाहिली श्रद्धांजली…

मुंबई :- समृद्धी महामार्गावर सातत्याने होणारे अपघात हा कळीचा मुद्दा बनला असून खासगी वाहनांची सुव्यवस्था आणि वेगमर्यादा यावर सरकारने कठोर नियम करणे गरजेचे आहे असे स्पष्ट मत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी ट्वीट करत व्यक्त केले आहे.

समृद्धी महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात खाजगी प्रवासी बसने पेट घेतल्याने सुमारे २१ प्रवाशांचा मृत्यू झाल्याची घटना अत्यंत दुर्दैवी आहे. मृत व्यक्तींच्या कुटुंबियांच्या दुःखात संपूर्ण राष्ट्रवादी परिवार सहभागी असल्याचे सांगतानाच मृतांना जयंत पाटील यांनी श्रद्धांजली वाहिली आहे. तर जखमी झालेल्या प्रवाशांना योग्य उपचार मिळावे यासाठी शासनाने तात्काळ पावले उचलावीत अशीही मागणी जयंत पाटील यांनी केली आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

स्वभावाचेही ‘मॅनेजमेंट’ गरजेचे! - केंद्रीय मंत्री नितीन गडकरी

Sat Jul 1 , 2023
– आयआयएमच्या विद्यार्थ्यांशी संवाद नागपूर :- भविष्यात उपयुक्त ठरणारे तंत्रज्ञान विकसित करा, मार्केटचा अभ्यास करा आणि सर्वसामान्य लोकांचे भले करणारे संशोधनही करा. हे सारे आवश्यक आहेच. पण लोकांसोबत तुमची वागणूक चांगली नसेल तर त्या यशाचा काहीच उपयोग नाही. मनुष्याचा स्वभाव आणि त्याची वागणूक ही सर्वांत मोठी शक्ती आहे, असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी केले. […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com