सर्वच घटकांना न्याय देऊन गरिबांच्या कल्याणाचा विचार – ना. सुधीर मुनगंटीवार

मुंबई :- महाराष्ट्रातील सर्वच घटकांना न्याय देत गरिबांच्या कल्याणाचा विचार करणारा अर्थसंकल्प महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार यांनी सादर केला असून ‘गरीबोके सन्मान में महाराष्ट्र सरकार पूर्ण शक्ती के साथ मैदान में’, अशी प्रतिक्रिया राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री ना. सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केली.

देशगौरव पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताला विश्वगुरू बनविण्याचे स्वप्न पाहिले आहे. विकसित भारताची संकल्पना साकार करण्यासाठी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री  अजित पवार यांनी सर्वांना समान न्याय देणारा अर्थसंकल्प सादर केला. समाजातील सर्व घटकांचा समतोल विकास या अर्थसंकल्पातून होणार आहे. शिक्षण, रोजगार, शेती, उद्योग, महिला, तरुण, विद्यार्थी अश्या सर्वच घटकांना सामावून घेणारा, न्याय देणारा असा हा अर्थसंकल्प आहे, अशी प्रतिक्रिया ना. मुनगंटीवार यांनी व्यक्त केली आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज नागपूर आणि यवतमाळ दौऱ्यावर

Wed Feb 28 , 2024
नागपूर :- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बुधवार दि. 28 फेब्रुवारी रोजी नागपूर आणि यवतमाळ दौऱ्यावर येत आहेत. त्यांच्या दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे असेल. दुपारी 2.15 वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय नागपूर विमानतळ येथे आगमन व हेलिकॅाप्टरने जवाहरलाल दर्डा एअरस्ट्रीप हेलिपॅड यवतमाळकडे प्रयाण. दुपारी 3.15 वाजता जवाहरलाल दर्डा एअरस्ट्रीप हेलिपॅड, यवतमाळ येथे आगमन व राखीव. दुपारी 4.25 वाजता प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या आगमन […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com