संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- नागपूर शहर पोलीस आयुक्तालय परिमंडळ क्र 5 हद्दीत येणाऱ्या कामठी पोलीस स्टेशन हद्दीतील लोकवस्त्या व बाजारपेठ ह्या कामठी शहरातून जाणाऱ्या नागपूर जबलपूर राष्ट्रीय महामार्ग क्र 7 च्या कडेला आहेत.या महामार्गाच्या कडेला असलेल्या लोकवस्तीतील नागरिकांना दैनंदिन कामानिमित्त घराबाहेर पडून सदर महामार्ग ओलांडूनच जावे लागते. मात्र वाहतूक पोलीस विभागाच्या वतीने लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेरा तसेच रस्त्याच्या कडेला असलेल्या वाहतूक पोलिसांच्या कॅमेऱ्यात कैद झालेल्या विना हेल्मेट वाहतूकदाराना मोठ्या प्रमानात चालान स्वरूपात भुर्दंड भोगावा लागत आहे.सर्वसामान्य नागरिकांना हे असह्य आहे.आता घराबाहेर पडून हाकेच्या अंतरावर असलेल्या बाजारात जायला सुद्धा हेल्मेट सक्ती झाली आहे.बाजरात किरकोळ विक्री करणाऱ्या पासून तर मोठ्या व्यावसायिकांना सुद्धा हेल्मेट सक्ती करण्यात आली आहे .अन्यथा दंड भरावा लागत आहे.तेव्हा या प्रकारची हिटलरशाही बंद करून नागरिकांच्या रोषाला आव्हान न देता नागरी हितार्थ शहरात शहरवासीयांना हेल्मेटसक्तीत शिथिलता देण्यात यावी तसेच गोयल टॉकीज समोर लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याद्वारे देण्यात आलेले चालान रद्द करण्यात यावे या मागणीसाठी आशयाचे एक सामूहिक निवेदन कांग्रेसचे कामठी शहर अध्यक्ष कृष्णा यादव यांच्या नेतृत्वात वाहतूक पोलीस निरीक्षक गोसावी यांना देण्यात आले.
याप्रसंगी तुषार दावाणी, मनोज यादव, मो उबेद सईद अफरोज, आशिष मेश्राम, राजकुमार गेडाम, संदीप जैन, कुसूम खोब्रागडे,आनंद खोब्रागडे, प्रवेश चिमनकर, मो हुजैफ कुरेशी, अब्दुल सलाम अन्सारी,मो सुलतान,प्रकाश लाईनपांडे, प्रमोद झोडापे,तसेच सुरेय्या बानो,यासह महिलागण उपस्थित होते.