-भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांचे डोके ठिकाणावर नाही – काँग्रेस प्रदेश प्रवक्ता दिलीप एडतकर
अमरावती दि. 8 – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरुध्द तथाकथित कारस्थानाच्या चौकशीत हस्तक्षेप करण्याचा हास्यास्पद आरोप करुन काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले यांचेवर कारवाईची मागणी करणार्या भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचे डोके ठिंकाणावर नाही असा दावा करत राज्यात अतिरिक्त मानसोपचार रुग्णालयाची नितांत गरज असल्याचे प्रतिपादन प्रदेश काँग्रेस प्रवक्ता अॅड. दिलीप एडतकर यांनी केले आहे.
नानाभाऊ पटोले यांनी केंद्रीय गृहमंत्री अमीत शहा यांचेवर केलेला वार भाजपच्या जिव्हारी लागल्यामुळे नानाभाऊंचा अमीत शहांविरुध्दच्या आरोपात तथ्य असल्याच्या वस्तुस्थितीला चंद्रकांत पाटलांनी दुजोरा दिल्याचे दिलीप एडतकर यांनी म्हटले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सुरक्षेची प्राथमिक जबाबदारी अमीत शहा यांच्या नियंत्रणातील यंत्रणाचीच होती त्यामुळे पंतप्रधानांवरील तथाकथित सुुरक्षा धोक्यासाठी अमीत शहाच जबाबदार आहेत असा आरोप नानाभाऊंनी केला म्हणून त्यांच्यावरच कारवाई करण्याची हास्यास्पद मागणी डोके फिरल्याचेच लक्षण होय. पंतप्रधानांच्या सुरक्षेसाठी केंद्रीय गृहखाते दुरुस्त करण्याच्या मागणी ऐवजी प्रदेश काँग्रेसाध्यक्षावर कारवाई करण्याची मागणी बालिश आहे, असे काँग्रेस प्रदेश प्रवक्ते दिलीप एडतकर यांनी म्हटले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभेला 500 लोकाही गोळा न झाल्याने पंतप्रधानांनी आंदोलकांनी अडवल्याचा कांगावा करुन माघारी परतण्याची नौटंकी करण्यात आली. वस्तुत: मोदींना अडवणारे त्यांच्या स्वागतासाठी सामोरे येणारे त्याच्याच पक्षाचे कार्यकर्ते होते. ते भाजपाचे ध्वज फडकवत मोदी जिंदाबादचे नारे देत असलेली चित्रफितही प्रसारित झाल्याचा दावा नानाभाऊ पटोले यांनी केल्याचे नमुद करुन भाजपच्या प्रदेशाध्यक्षानी तोंड सांभाळून व डोके ठिकाणावर ठेवून बोलावे असा सल्ला प्रदेश प्रवक्ते दिलीप एडतकर यांनी चंद्रकांत पाटलांना दिला आहे.
पंजाब मधील पंतप्रधानांच्या सुरक्षा व्यवस्थेबाबत केंद्रीय गृहमंत्री जबाबदार असून स्थानीक भाजपाची भजन मंडळी मात्र पंजाब सरकारला दोषी ठरवून निषेध करीत असल्याबद्दल वाढत्या कोरोनाांचा भाजप भक्तांच्या मेंदूवरही परिणाम झाल्याचेच हे द्योतक असल्याचे दिलीप एडतकर यांनी म्हटले आहे.