कांग्रेस सेवादल महाराष्ट्र प्रदेश सहसचिवाच्या सुनेची विषारी औषध प्राशन करून आत्महत्या

संदीप कांबळे, कामठी
कामठी ता प्र 5:- कांग्रेस सेवादल चे महाराष्ट्र प्रदेश महासचिव राजकुमार गेडाम यांच्या लहान सुनेने विषारी औषध खाऊन आत्महत्या केल्याची घटना काल दुपारी 2 वाजेदरम्यान घडली असून मृतक विवाहित तरुणीचे नाव नीता तुषार गेडाम वय 30 वर्षे रा जे पी नगर कामठी असे आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सदर मृतक तरुणी एक वर्षाच्या कालावधीतच विवाहबद्ध झाली असून सासर च्या घरी न राहता हे दोघेही पती पत्नी जे पी नगर येथे भाड्याच्या खोलीत वास्तव्यास होते.काल 4 एप्रिल ला दुपारी 2 दरम्यान अज्ञात कारणावरून विषारी औषध खाऊन खाल्ल्याची घटना घडताच उपचारार्थ त्वरित शासकीय उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले.मात्र परिस्थिती नाजूक असल्याने पुढील उपचारार्थ नागपूर येथील मेयो इस्पितळात हलविण्यात आले.तर रुग्णालयात उपचारादरम्यान सदर तरुणी मरण पावली.मृतक तरुणीच्या पार्थिवावर मेयो हॉस्पिटल येथे शवविच्छेदन करण्यात आले.पोलिसांनी यासंदर्भात आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून आत्महत्येचे कारण अजूनही गुलदस्त्यात आहे.मृतक तरुणीच्या पाठीमागे आई, वडील व तीन बहिणी असा बराच मोठा आप्तपरिवार आहे.या घटनेने परिसरात शोककळा पसरली आहे

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

कामठी तालुक्यात बोगस डॉक्टरांचा सुळसुळाट

Tue Apr 5 , 2022
संदीप कांबळे, कामठी -कारवाईची गरज मात्र प्रशासनाची डोळेझाक -बोगस डॉक्टरांचा रुग्णाच्या आरोग्याशी खेळखंडोबा कामठी ता प्र 5:-कामठी तालुक्यातील शहर तसेच ग्रामीण भागात बोगस डॉक्टरांचे जाळे पसरले असून मागच्या वर्षी सहा मे ला स्थानिक नवीन कामठी पोलिस स्टेशन च्या पोलिसांनी सैलाब नगर कामठी येथे एका बोगस धर्मार्थ दवाखान्यावर धाड घालण्यात यश गाठले होते.यासारख्या बोगस डॉक्टरांचा खेळ ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात सुरू […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!