चोरीच्या गुन्ह्यात अडकलेल्या तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

कामठी :- स्थानिक नवीन कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या यशोधरा नगर येथिल रहिवासी व जुनी कामठी पोलीस स्टेशन ला कार्यरत पोलीस कर्मचारी लक्ष्मीकांत बारलिंगे यांच्या घरी धम्मचक्र प्रवर्तन दिनी झालेल्या 5 लक्ष रूपयाची घरफोडी झाली होती. या गुन्ह्याचा पोलिसांनी पर्दाफाश करीत पाच आरोपीवर गुन्हा दाखल करीत त्यांच्याकडून 3 लक्ष 4 हजार रुपयाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.यातील तरुण मेश्राम नामक आरोपी अजूनही अटकेबाहेर आहे तर अटक झालेल्या चार आरोपीपैकी रौनक पाटील नामक तरुणाने चोरीच्या गुन्ह्यात अडकल्याच्या मानसिक तणावातून नागपूर येथील निर्मल कॉलोनी येथे एका नातेवाईकाच्या घरी गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना काल सकाळी 9 वाजता घडली असून ही आत्महत्या पोलिसांच्या केलेल्या जाचक त्रासासह बेदम मारहाणला कंटाळून तसेच झालेल्या बदनामीमुळे केली असून या आत्महत्याला प्रवृत्त करणाऱ्या पोलीस कर्मचारी सुरेंद्र शेंडे,अनिल बाळराजे व लक्ष्मीकांत बारलिंगे विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात यावा या मागणीसाठी मृतक रौनक पाटील च्या कुटुंबीयांनी रौनक पाटील ला न्याय मिळवून देण्याहेतू जयस्तंभ चौकात मृतक रौनक पाटीलची अस्थी घेऊन पोलीस प्रशासना विरोधात ठिय्या आंदोलन करण्यात आले .तसेच पोलीस प्रशासन मुर्दाबादचे नारेबाजी करण्यात आले. तसेच आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या पोलिसांवर गुन्हा दाखल होईपर्यंत अस्थी विसर्जन करणार नसल्याचा थेट ईशारा देण्यात आला.

24 ऑक्टोबर ला घडलेल्या पोलिसाच्या घरच्या घरफोडी प्रकरणात नवीन कामठी पोलिसांनी 28 नोव्हेंबर ला पाच आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला.ज्यामध्ये रौनक पाटील रा खलाशी लाईन कामठी,स्वरूप बोरकर रा कमसरी बाजार कामठी,युवराज गायकवाड रा कन्हान, राकेश गुप्ता रा कन्हान ,तसेच तरुण मेश्राम रा खलाशी लाईन कामठीचा समावेश आहे.यातील राकेश ज्वेलर्स चे मालक राकेश गुप्तां ला सुचनापत्र देऊन सोडण्यात आले तर आरोपी तरुण मेश्राम अजूनही अटकेबाहेर आहे तर इतर तीन आरोपीना अटक करून 8 डिसेंबर पर्यंत नागपूर मध्यवर्ती कारागृहात पाठविण्यात आले होते यानंतर जामिनावर सुटून आल्यानंतर रौनक पाटील यांनी पोलीस स्टेशन पासून ते नागपूर मध्यवर्ती कारागृहातील न्यायालयीन पोलीस कोठडी चा 28 नोव्हेंबर ते 8 डीसेंबर पर्यंतच्या कालावधीत डोक्यावर ताण घेऊन स्वतःला अडकविन्यात आल्याचा संताप घेऊन आपली बदनामी झाली या भीतीतुन कामठी ला परत न येता नागपूर च्या नातेवाईकाकडे वास्तव्य केले मात्र डोक्यात तेच बेईजतीचे कालचक्र फिरत असल्याने जरीपटका पोलीस स्टेशन हद्दीतील निर्मल कॉलोनीत गळफास लावून आत्महत्या करून जगाचा शेवटचा निरोप घेतला.

या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत असला तरी या आत्महत्याल पोलिसच जवाबदार असल्याचा थेट आरोप मृतक रौनक पाटील चे वडील भारत पाटील यांनी केला आहे.,कारण पोलिसांनी रौनक पाटील हा कुठलाही सराईत गुन्हेगार नसूनही रौनक ला एका चोरीच्या खोट्या प्रकरणात आरोपी बनवून त्याला पोलीस कोठडीत बेदम मारहाण करून जामीन झाल्यावर पुन्हा दुसऱ्या गुन्ह्यात आरोपी बनविण्याची धमकी देत आत्महत्येस प्रवृत्त केले.मृतक रौनक पाटील ला 29 नोव्हेंबर ला कोर्टात हजर केल्यावर मिळा लेल्या दोन दिवसांच्या पोलीस कोठडीत पोलीस कर्मचारी सुरेंद्र शेंडे व अनिल बळराजे यांनी लक्ष्मीकांत बारलिंगे व अविनाश भीमटे यांच्या सांगण्यावरून बेदम मारहाणं केली तसेच जामीन मिळण्यास विरोध केल्यामुळे 1 नोव्हेंबर ला मृतक रौनकची नागपूर मध्यवर्ती कारागृहात रवानगी करण्यात आली. न्यायालयीन कोठडीत प्रकृती बिघडली व त्याला 3 डीसेंबरला मेडिकल रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले.व 8 नोव्हेंबर ला कामठी न्यायालयातून मिळालेल्या जामिनीवर तो पोलिसांच्या भीतीने इतका हादरला होता की कामठीत यायला तयार नव्हता दरम्यान तो नागपूर ला आपल्या मामाकडे राहला मात्र झालेल्या मानसिक तनावातून पोलिसाच्या जाचक त्रासामुळे आत्महत्येस प्रवृत्त केल्यामुळे रौनक ने आत्महत्या केली तेव्हा आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या पोलीस कर्मचारी वर गुन्हा दाखल करावा अशी मागणी मृतक रौनकच्या कुटुंबीयांनी केली आहे.तेव्हा आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांवर पोलीस विभाग गुन्हा दाखल करणार की नाही याकडे सर्वांचे लक्ष वेधले आहे.

NewsToday24x7

Next Post

विकसित भारत संकल्पनेत युवकांनी सहभागी व्हावे  - प्रधानमंत्री नरेंद्र मोदी

Mon Dec 11 , 2023
– प्रधानमंत्री आणि राज्यपालांचा विकसित भारत@२०४७ निमित्त कुलगुरूंशी संवाद Your browser does not support HTML5 video. – विकसित भारताच्या उभारणीसाठी विद्यापीठ, शैक्षणिक संस्थासह विद्यार्थ्यांचा सहभाग महत्त्वाचा – राज्यपाल रमेश बैस मुंबई :- देशाच्या युवाशक्तीला दिशा देण्याची जबाबदारी सर्वांची आहे. नागरिकांच्या वैयक्तिक सहभागातूनच राष्ट्रउभारणी होते. विकसित भारताच्या संकल्पनेला प्राधान्य देऊन उद्दिष्ट पूर्तीसाठी विकसित भारत या संकल्पनेत युवकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com