नागपूर :- नुकत्याच झालेल्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ सिनेट निवडणुकीत काँग्रेस नेते गिरीश पांडव यांनी आपले वर्चस्व कायम राखत वीस वर्षांपासून सिनेट सदस्य असलेले ॲड.मनमोहन वाजपेयी यांना पुन्हा एकदा विजयी करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे.
काँग्रेस नेते गिरीश पांडव यांच्या विद्यार्थी संग्राम परिषदेच्या माध्यमातून वाजपेयी हे महाविकास आघाडीच्या गटात सहभागी झाले होते.
या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या गटाचा पराभव झाला असला तरी मात्र पांडव यांचे उमेदवार विजयी झाल्याने त्यांचे वर्चस्व कायम असल्याचे पुन्हा एकदा सिध्द झाले आहे.
आपल्या राजकीय कारकिर्दीला गिरीश पांडव यांनी सिनेट सदस्यापासूनच सुरुवात केली होती तसेच प्रदीर्घ काळ सिनेट सदस्य म्हणून काम केल्याने त्यांना वाजपेयी यांना सहजपणे निवडून आणणे त्यांना शक्य झाले.
येणाऱ्या काळात वाजपेयी विद्यापीठ आणि विद्यार्थी यांच्यात समन्वय साधून त्यांचे प्रश्न आणि समस्या सोडविण्यावर भर देतील असे यावेळी पांडव यांनी सांगितले.