नागपूर – अतिशय प्रतिष्ठेच्या आणि काट्याची लढत ठरलेल्या नागपूर जिल्ह्यातील ग्राम पंचायत निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचा दारुण पराभव झाला असून काँग्रेसने जोरदार मुसंडी मारली आहे.
हाती आलेल्या २३६ ग्राम पंचायत निकाला पैकी काँग्रेस ९३, राष्ट्रवादी काँग्रेस ३७, शिवसेना १४, भाजपा ८७ व अपक्ष ०५ जागेवर विजयी झाले आहे.
नागपूर जिल्ह्यातील रामटेक, कामठी, सावनेर, हिंगणा, उमरेड व काटोल या सहाही विधानसभा मतदार संघात या ग्राम पंचायत निवडणुका पार पडल्या. नागपूर जिल्हा ग्रामीण काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष तथा माजी मंत्री राजेंद्र मुळक यांच्या नेतृत्वाखाली व आ. सुनिल केदार, माजी मंत्री तसेच काँग्रेसचे सर्व नेते व कार्यकर्त्यानीं एकत्र येऊन जिल्ह्यात नेत्रदीपक यश प्राप्त केले.
जिल्ह्यातील बड्या-बड्या भाजप नेत्यांच्याच घरात भाजपचा दारुण पराभव झाल्याने नागपूर जिल्ह्याच्या ग्रामीण राजकारणात प्रचंड खळबळ माजली आहे. काँग्रेस कार्यकर्ते गावागावात प्रचंड उत्साहात जित साजरी करताना दिसत असून भाजप वर्तुळात मात्र चिंतेचे सावट दिसत आहे.
नागपूर जिल्ह्यातील सहाही विधानसभा मतदार संघात विजयी झालेल्या सरपंच आणि ग्राम पंचायत सदस्यांचे नागपूर जिल्हा अध्यक्ष राजेंद्र मुळक यांनी अभिनंदन केले आहे. नागपूर जिल्ह्यातील जनतेचे काँग्रेस पक्षावर टाकलेल्या या विश्वासाबद्दल राजेंद्र मुळक यांनी सर्व जनतेचे, कार्यकर्तेचे व मतदाराचे हि आभार मानले आहेत.
@ फाईल फोटो