मागील महिन्यात 10 दिवस हिवाळी अधिवेशनात सत्ताधाऱ्यांविरोधात सभागृहात काँग्रेसचे आमदार सर्वाधिक आक्रमक होते.नागपूरला अधिवेशन,काँग्रेसचे प्रदेशाध्यक्षपद विदर्भाकडेच यामुळे नाना भाऊंची या काळातली सकाळी 8 ते रात्री 2, 3 वाजेपर्यंतची धावपळ अनुभवली.एक ही दिवस साधारण 5 तास ही झोप त्यांना मिळाली नाही हें मी खात्रीने सांगतो. त्या अगोदर पाच राज्यातील विधानसभा निवडणूकांची घाई सुरू होती.नाना भाऊंकडेही अनेक मतदार संघातील प्रचाराच्या जबाबदाऱ्या होत्या.बाहेरच्या राज्यातला प्रवास, विदर्भ तेथून मुंबई, उर्वरित महाराष्ट्रात दररोज कुठं ना कुठं जावंच लागायचं.आंदोलन,बैठक,कार्यक्रम,भेटी,चर्चा,पत्रकार परिषदा असं शारीरिक,मानसिक दमवणारं शेड्युल.निवडणुका झाल्या की लगेच अधिवेशनात की लगेच 28 डिसेंबर काँग्रेस वर्धापन दिवस साजरा करण्यासाठी, लोकसभा 2024 प्रचाराचा शुभारंभ करणारी ‘है तैयार हम’ ची राष्ट्रीय स्तरावरील जंगी सभा. सर्व मोठ्या नेत्यांसह लाखों लोकं आले. कोणत्याही पक्ष संघटनेतील कार्यकर्त्याला या सभांसाठी काय कष्ट लागतात याची कल्पना आहे.ती सभा यशस्वी करून नाना भाऊ लगेच नागपूरहून मुंबईत. मुंबईत दिवसभर प्रदेश कार्यालयातील कामं मार्गी लावून रात्री रेल्वेने नासिक,जळगाव. दिवसभर सार्वजनिक कार्यक्रम,बैठका,प्रेस,भेटी असं उरकतं मध्यरात्री 2 वा. रेल्वे स्टेशनवर पुण्याच्या रेल्वेची वाट पाहतं बसले. हा फोटो 2 वाजून 16 मिनिटांनी काढलेला.सकाळी 11 च्या दरम्यान पुणे स्थानकावर,तासभरात हॉटेलमध्ये फ्रेश होऊन विद्यार्थी शिष्टमंडळ,स्थानिक नेते,कार्यकर्ते भेटी,नंतर सावित्रीबाई जयंती अभिवादन फुले वाडा,एक तासाभराचा कौटुंबिक कार्यक्रम,काँग्रेस भवनला तासाभराची पत्रकार परिषद, लगेच पुणे लोकसभा पूर्वतयारी आढावा बैठक दिड तास,इंडिया फ्रंट नावाखाली पुरोगामी संस्था प्रतिनिधी सोबत दिड तासाची बैठक,पुढारी वर्धापन दिन कार्यालयाला भेट,बाणेर भागात रात्री नातेवाईकांच्या लग्नात.ते संपवून पहाटे कधीतरी ते मुंबईला पोहोचले असतील,तिथं किती वेळ थांबले माहित नाही. सकाळी AICC च्या दिल्लीतील बैठकीत नाना दिसलें. यात कुठेही चिडचिड,संताप,नाराजी त्यांच्या चेहऱ्यावर दिसतं नाही.अशी माणसं आळस दाखवायला स्वतःलाचं परवानगी देतं नाहीत.राजकारणी माणसाला एकाच वेळी किती आघाड्यांवर लढावं लागतं याची कल्पना आपणास आहेच.राज्यभरातील वरिष्ठ नेत्यांची दिनचर्या कमी अधिक अशीच असते.मी लिहिणार अनेकांवर,काँग्रेस खूप कष्ट घेतेय…मी पाहतोय!असतील आमच्याही कांही कमतरता पण धावतोय आम्ही.
काँग्रेस मी पाहतोय तशी..भाग 1
Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com