यवतमाळ :- जिल्ह्यातील पथक, उपपथकामधील पुरुष, महिला होमगार्डची सदस्य नोंदणी दि. 28 ऑगस्ट रोजी पोलिस कवायत मैदान, पळसवाडी, यवतमाळ या ठिकाणी घेण्यात येणार आहे. होमगार्डसाठी ईच्छूकांनी दि.26 जुलै ते 17 ऑगस्ट या कालावधीत ऑनलाईन अर्ज सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
दि. 28 ऑगस्ट रोजी सकाळी 7 वाजतापासून नोंदणी घेण्यात येणार आहे. होमगार्ड नोंदणी पात्रतेसाठी शिक्षण कमीत कमी 10 वी उत्तीर्ण असावे. वय 20 ते 50 वर्षे तर उंची पुरुषाकरिता 162 सेमी व महिलांकरिता 150 सेमी ईतकी असावी. संबंधित उमेदवारास विहित केलेल्या वेळेत धावणे व गोळाफेक शारिरीक चाचणी द्यावी लागेल.
निवड होऊन पात्र ठरलेले उमेदवार हे वेतनी सेवेत असतील तर त्यांना वेतनी सेवेत असल्याचे कार्यालयाचे अथवा मालकाचे ना-हरकत प्रमाणपत्र, पोलिस चारित्र्य पडताळणी अहवाल व सक्षम वैद्यकीय अधिकाऱ्यांचे शारिरीकदृष्ट्या सक्षम असल्याचे प्रमाणपत्र, माजी सैनिक अथवा एनसीसी प्रमाणपत्रधारक व इतर अन्य तपशीलाच्या पुष्टयर्थ सर्व संबंधित प्रमाणपत्रे सादर करणे बंधनकारक राहील.
होमगार्ड नोंदणीचे अर्ज दि. 26 जुलै ते 17 ऑगस्ट या कालावधीमध्ये https://maharashtracdhg. gov.in/mahahg/enrollmentform.php या संकेतस्थळावर फक्त इंग्रजी या भाषेमधून भरावयाचा आहे. अर्ज भरतांना सर्व माहिती काळजीपूर्वक भरावयाची आहे. उमेदवारास नोंदणीच्यावेळी त्यांना स्वखर्चाने यावे लागेल. नोंदणीचेवेळी कोणतीही अपघाती घटना घडल्यास त्याची जबाबदारी संबंधित उमेदवाराची राहील उमेदवारांची निवड पुर्णपणे गुणवत्तेवर करण्यात येईल, असे जिल्हा समादेशक होमगार्ड पियुष जगताप यांनी कळविले आहे़.