अनुकंपा पदभरतीसाठी विशेष मोहिम राबवा – विजयलक्ष्मी बिदरी

Ø अनुकंपाच्या 500 जागा भरण्याचे उद्दिष्ट्य

Ø पदभरतीबाबत 70 विभागांचा आढावा

नागपूर :- अनुकंपा तत्वावरील पदभरतीसाठी विभागात विशेष मोहिम राबवून येत्या एक महिन्यात अनुकंपा पदभरती प्रक्रिया पूर्ण करावी, अशा सूचना विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांनी आज दिल्या. विभागात अनुकंपा तत्वावरील पाचशे उमेदवार भरतीचे उद्दिष्ट्य पूर्ण करण्यासाठी जिल्हाधिकारी तसेच सर्व विभागप्रमुखांनी भरती प्रक्रियेला गती द्यावी, असेही यावेळी बिदरी यांनी सांगितले.

विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात अनुकंपा पदाच्या भरतीचा आढावा विभाग आयुक्त बिदरी यांनी घेतला, त्यावेळी त्या बोतल होत्या. बैठकीला आदिवासी विभागाचे अपर आयुक्त रविंद्र ठाकरे, जिल्हाधिकारी चिन्मय गोतमारे (गोंदिया), संजय मीना (गडचिरोली), डॉ. विपीन इटनकर (नागपूर), राहुल कर्डिले (वर्धा), विनय गौडा (चंद्रपूर), योगेश कुंभेजकर (भंडारा), अनुकंपा नियुक्तीच्या विभागीय समन्वयक अधिकारी तथा उपायुक्त (रोहयो) राजलक्ष्मी शहा तसेच विभागातील सर्व विभागप्रमुख यावेळी उपस्थित होते.

शासन निर्णयानुसार गट-क व गट-ड मधील सरळसेवेच्या एकूण पदांपैकी 20 टक्के पदे अनुकंपाद्वारे भरायची आहेत. पदभरती करतांना अनुकंपा तत्वावरील नियुक्तीला प्राधान्य द्यावे. अनुकंपा प्रतिक्षा यादीत उमेदवार उपलब्ध नसतील अशा विभागांनी जिल्ह्याच्या सामायिक यादीतून भरती करावी. तसेच गट-क संदर्भात जिल्ह्यात उमेदवार उपलब्ध नसल्यास इतर जिल्ह्यातील प्रतिक्षा यादीतून जेष्ठतेनुसार उमेदवारांची निवड करावी. विशेष तांत्रिक अर्हता आवश्यक असणारे उमेदवार उपलब्ध न झाल्यास इतर जिल्ह्यांकडे अनुकंपा उमेदवारांची मागणी करावी. गट-ड ची पदे जिल्ह्यातील प्रतिक्षा यादीतूनच भरण्यात यावे. विहित कालावधीत नियुक्ती न स्विकारणाऱ्या उमेदवारांऐवजी प्रतिक्षा यादीतील उमेदवारांना नियुक्ती देण्यात यावी. सर्व विभागांनी गट-क व गट-ड ची अनुकंपा पदभरती नागपूर विभागातील सामायिक प्रतिक्षा यादीतून करण्याच्या सूचनाही बिदरी यांनी दिल्या.

महसूल, कृषी, पोलीस, सहकार, आरोग्य, लेखा व कोषागारे, आदिवासी विकास, वन, आरोग्य, समाजकल्याण आदींसह विविध 70 विभागांचा आढावा बिदरी यांनी घेतला.

डिसेंबर अखेर विभागात एकूण 1 हजार 769 उमेदवार अनुकंपा प्रतिक्षा यादीत होते. त्यापैकी जून पर्यंत 822 उमेदवारांना नियुक्ती देण्यात आली असल्याची माहिती उपायुक्त राजलक्ष्मी शहा यांनी दिली.

मुख्यमंत्री सचिवालय कक्षातील निवेदनांवर प्राधान्याने कार्यवाही

मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्याकडे निवेदन देण्यासाठी मुंबई येथे जावे लागू नये आणि वेळ व पैशाची बचत व्हावी म्हणून प्रत्येक जिल्ह्यात निवासी उपजिल्हाधिकारी यांचे कार्यालयात मुख्यमंत्री सचिवालय कक्ष स्थापन केला आहे. या कक्षाकडे प्राप्त होणारी निवेदने आवश्यक कार्यवाहीसाठी संबंधीत विभागाकडे पाठविण्यात येतात. त्यावर प्राधान्याने कार्यवाही करण्याच्या सूचना बिदरी यांनी यावेळी अधिकाऱ्यांना दिल्या.

जिल्हाधिकारी यांनी अनुकंपा पदभरतीबाबतची माहिती बैठकीत दिली. यावेळी विविध विभागाचे विभागप्रमुख उपस्थित होते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

डेक्कन ओडिसी ट्रेन-२.० मुळे होईल राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पर्यटनात वाढ - महाजन

Fri Sep 22 , 2023
– डेक्कन ओडिसी ट्रेन-२.० पर्यटकांसाठी उपलब्ध मुंबई :- डेक्कन ओडिसी ट्रेन-२.० या आलीशान व आरामदायी ट्रेनचा प्रमुख उद्देश राज्यातील पर्यटन स्थळांची राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पर्यटकांना ओळख करून देणे आहे. डेक्कन ओडिसी ट्रेन 2.0 ही नव्या स्वरूपात आल्यामुळे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय दर्जाच्या पर्यटनात वाढ होईल, असे पर्यटन मंत्री गिरीश महाजन यांनी सांगितले. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथील फलाट क्रमांक १८ वर […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!