किलोचे तीन पाव देणार्‍यांची स्पर्धा

– आठवडी बाजारात ग्राहकांची सर्रास लूट

– ग्राहकांना आकर्षीत करण्यासाठी नवी शक्कल

– पथकावर हल्ले, विक्रेत्यावर दंड

नागपूर :- आठवडी बाजारात एक भाजीविक्रेता 40 रुपये किलो प्रमाणे तर दुसरा 20 रुपये किलो प्रमाणे भाज्या (एकच वस्तु) विकतो. स्वस्त विकणार्‍याकडे ग्राहकांची गर्दी असते तर महाग विकणार्‍यांकडे ग्राहक फिरकत नाही. मात्र, येवढे स्वस्त कसे काय? असा प्रश्न ग्राहकाला पडत नाही, आणि येथेच ग्राहकांची फसगत होते.

सध्या शहरातील आठवडी बाजारासह गर्दीच्या ठिकाणी आणि नियमित बाजारात किलोचे तीन पाव विकणार्‍यांची स्पर्धा लागली आहे. सर्रास ग्राहकांची लुट केली जाते. मात्र, ग्राहकांच्या लक्षात येत नाही. एखादीच जागरुक ग्राहक वजनावर संशय व्यक्त करतो आणि घेतलेल्या भाज्या परत करून पुढे निघतो. मात्र, शक्कलबाज विक्रेत्यांमुळे प्रामाणिक भाजी विक्रेत्यांचे (दुकानदार) नुकसान होते.

आठवडी बाजारात दिवसभर आणि सायंकाळी 7 वाजेपर्यंत येणार्‍या ग्राहकांची आर्थिक स्थिती भक्कम असते. असा ढोबळमानाने भाजी विक्रेत्यांनी परस्पर अंदाज काढला. त्यामुळे दुपारी आणि सायंकाळपर्यंत भाज्यांचे भाव कडाडलेले असतात. शिवाय वजनमापातही प्रामाणिकता जपली जाते. मात्र, रात्री आठ नंतर बाजारात येणारा ग्राहक हा निव्वळ भाव करणारा आणि स्वतात मागणारा असतो. अशी विक्रेत्यांची मानसिकता झाली आहे. मात्र, बर्‍याच लोकांना वेळच मिळत नसल्याने ते निवांतपणे रात्री बाजारात जातात.

सर्वच विक्रेेते एकाच दृष्टीने पाहतात असे नाही. मोजक्या विक्रेत्यांमुळे संपूर्ण विक्रेत्याकडेच संशयाच्या नजरेने पाहिले जाते. ग्राहकांची गर्दी, आरडा ओरड आणि धावपळ दाखवत भाजीविक्रेता किलोचे तीन पाव देता, याकडे ग्राहकांचे दुर्लक्ष होते. भाजी विक्रेत्याने दिलेल्या माहिती नुसार बरेचदा मनपाचे तसेच वजनमाप विभागातील पथक आठवडी बाजारात धाड मारून वजनकाटे जप्त करतात. दंडही ठोठावला आहे. पथकात दोन चार कर्मचारी आणि विक्रेत्यांची संख्या अधिक असल्याने बरेचदा कर्मचार्‍यांवर हल्ला सुध्दा झाला आहे.

कालबाह्य वजन तातडीने बदलावे

वजन माप विभाग मोठ्या प्रमाणावर काम करीत आहे. तरी सुध्दा कालबाह्य झालेले जुने वजन बदलून नवीन वजन देण्यात यावे, अशी मागणी ग्राहक पंचायत महाराष्ट्राचे विदर्भ प्रांत अध्यक्ष शामकांत पात्रीकर यांनी केली. वजन माप विभागाने तातडीने वजन तपासून घ्यावे आणि कारवाई करावी तसेच ग्राहकांनी सुध्दा जागरुक राहूनच खरेदी करावी, असे आवाहन पात्रीकर यांनी केले.

@ फाईल फोटो

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

‘खेलो इंडिया’ युथ गेम्स २०२२-२३ महाराष्ट्राचे नवव्या दिवशी ८३ पदकांसह अग्रस्थान कायम

Tue Feb 7 , 2023
मुंबई : गुजरात मधील राष्ट्रीय क्रीडास्पर्धांपाठोपाठ मध्यप्रदेश येथे आयोजित पाचव्या ‘खेलो इंडिया’ युवा स्पर्धेत राज्याच्या संघातील युवा खेळाडू नेत्रदीपक कामगिरी करत आहेत. जागतिक स्तरावरील स्पर्धा गाजवण्याची क्षमता असलेले युवा खेळाडू सध्या ‘खेलो इंडिया’ मध्ये पदकांचे मानकरी ठरत आहेत. याच दर्जेदार कामगिरीमुळे महाराष्ट्राचे खेळाडू निश्चितपणे आगामी काळामध्ये ऑलम्पिक सारखी स्पर्धा गाजवतील, ही प्रचंड क्षमता या युवा खेळाडूंमध्ये आहे, अशा शब्दात महाराष्ट्राचे […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com