राष्ट्रकुल संसदीय अभ्यास वर्ग : सार्वभौम भारत घडवण्यात तरुणांचे योगदान मोलाचे – विधान सभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार

नागपूर :-  जात, धर्म, पंथ, प्रांत, भाषा, लिंग आणि रंग असा कोणताही भेद न पाळता संविधानाने सर्व अधिकार लोकांना दिले आहेत. त्यामुळे सार्वभौम, धर्मनिरपेक्ष भारत घडवण्यात तरुणांनी पुढाकार घेऊन या कमी स्वतःला झोकून देऊन काम करावे, असे आवाहन विधान सभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केले.

राष्ट्रकुल संसदीय अभ्यास वर्गात संसदीय लोकशाहीत सत्तारूढ आणि विरोधी पक्षांचे स्थान, कर्तव्ये आणि विधी मंडळातील भूमिका या विषयावर अभ्यास वर्गास सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत हाते. यावेळी आमदार प्रविण दरेकर, विधानमंडळ सचिव विलास आठवले उपस्थित होते.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानात मोठी ताकद आहे. संविधानाने देशातल्या प्रत्येक नागरिकाला सामाजिक, आर्थिक आणि राजनैतिक न्याय, विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य दिले आहे. विविधतेने नटलेली ही आपली लोकशाही टिकवण्यात व सार्वभौम भारत घडवण्यात तरुणांचे योगदान मोलाचे असल्याचे वडेट्टीवार यांनी सांगितले.

संसदीय लोकशाहीत संविधानाने दिलेल्या तत्वानुसार जनहिताचे निर्णय घेणे हे सत्ताधारी पक्षाचे काम आहे. तर कायदे, नियमानुसार सत्ताधारी पक्षाची कामे होतात की नाही ही पाहण्याची जबाबदारी विरोधी पक्षाची आहे. प्रत्येकाला वेगळा विचार मांडण्याची संधी संविधानाने दिली असून सत्ताधाऱ्यांनी मानवतावादी विचार जिवंत ठेवण्याची भूमिका पार पाडणे जरुरीचे आहे. अशा सर्व बाबींमध्ये सत्ताधाऱ्यांवर अंकुश ठेवण्याचे काम विरोधी पक्षाचे असून संसदीय लोकशाही व्यवस्थेत विरोधी पक्षाची भूमिका ही लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी सत्ताधारी पक्षाइतकीच महत्वाची असल्याचे वडेट्टीवार म्हणाले.

ब्रिटनचे पंतप्रधान विस्टन चर्चिल म्हणाले होते, भारतात लोकशाही टिकणार नाही. तथापि आजही आपल्या देशातील विविधतेने नटलेली लोकशाही लोकांनी जपली आहे. यापुढेही संविधानाचे रक्षण करणे हे सत्ताधारी आणि विरोधी पक्ष या दोघांची महत्वपूर्ण जबाबदारी असून यामध्ये नागरिकांचा सहभागही तितकाच महत्त्वाचे आहे असे वडेट्टीवार म्हणाले.

संसद, विधीमंडळ ही लोकांचे प्रतिनिधित्व करणारी लोकशाहीची मंदिरे आहेत. राष्ट्रकुल संसदीय अभ्यास वर्गाच्या माध्यमातून संसदीय लोकशाहीचे मूल्य शिकवण्याचे काम होत आहे. राष्ट्रकुल संसदीय मंडळाने आपल्याला विचार मांडण्याची, विधिमंडळाचे कामकाज जाणून घेण्याची संधी दिली आहे.

त्यामुळे या अभ्यास वर्गात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांनी अभ्यासूवृत्तीने सामाजिक, राजकीय कार्यात पुढे येऊन लोकांच्या प्रश्नांना न्याय मिळवून द्यावा. आज तरुण समाज माध्यमांना बळी पडत असून तरुणांनी समाज माध्यमांचा चांगल्या कामासाठी वापर करावा, असे आवाहन त्यांनी केले.

विधिमंडळाचे जनसंपर्क अधिकारी निलेश मदाने यांनी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांचा परिचय करून दिला. संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाचा विद्यार्थी वैभव सारवे याने आभार मानले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

लोकशाहीमध्ये पक्ष संघटन हा विजयाचा पाया - आमदार प्रवीण दरेकर

Fri Dec 15 , 2023
नागपूर :- पक्ष सघटन हा लोकशाहीचा आत्मा असून लोकशाहीमध्ये मिळणाऱ्या विजयाचा पाया असल्याचे मत विधानपरिषदेचे आमदार प्रवीण दरेकर यांनी केले. राष्ट्रकुल संसदीय अभ्यासवर्गामध्ये संसदीय लोकशाहीत पक्ष संघटनेचे महत्व याविषयावर ते बोलत होते. यावेळी विधानमंडळाचे सचिव विलास आठवले, विधानमंडळाचे जनसंपर्क अधिकारी निलेश मदाने आदी उपस्थित होते. लोकशाहीचे संसदीय, प्रशासकीय, न्यायपालिका व माध्यम हे चार स्तंभ असल्याचे सांगून आमदार दरेकर म्हणाले, राजकीय […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!