नागरिकांना चांगल्या आरोग्य सेवा देण्यासाठी कटिबद्ध – खासदार कृपाल तुमाने

– येनवा येथे भव्य मोफत आरोग्य व शस्त्रक्रिया नोंदणी शिबीर

– 737 नागरिकांना चष्म्यांचे वाटप

– खा. कृपाल तुमाने शिवसेना वैद्यकीय कक्षातर्फे आयोजन

नागपूर :- काटोल तालुक्यातील येनवा येथे भव्य मोफत आरोग्य व शस्त्रक्रिया नोंदणी शिबीर आयोजन करण्यात आले. नागपूर जिल्हा शिवसेना व खासदार कृपाल तुमाने वैद्यकिय कक्षातर्फे भव्य शिबिराचे करण्यात आले होते. शिबिरात आयुष्यमान कार्ड आणि मोफत चष्मेही वाटप करण्यात आले. खासदार कृपाल तुमाने यांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन करण्यात आले.

रामटेक लोकसभा मतदारसंघाचे खासदार कृपाल तुमाने वैद्यकिय कक्षामार्फत जिल्हाभर आरोग्य शिबीर राबवण्यात येत आहे. शिबिरात विविध रोगांचे तज्ञ डॉक्टर्स असून सर्व रोगांचे निदान करण्यात आले. आरोग्य शिबिरात 845 रूग्णांनी नोंदणी केली. तर 737 रूग्णांना चष्मे वाटप आणि 135 रूग्णांची शस्त्रक्रियेसाठी नोंदणी करण्यात आली. त्याचबरोबर 51 नागरिकांचे आयुष्यमान कार्ड बनवण्यात आले. शिबिरात नेत्ररोग, मेडिसीन, सर्जरी, स्त्रीरोग, बालरोग, कान-नाक-घसा, अस्थिरोग, त्वचारोग, श्वसन रोग यासारख्या आजारांच्या तपासण्या आणि उपचार करण्यात आले. तसेच डोळ्यांची तपासणी करून मोफत चष्मांचे सुद्धा वाटप करण्यात आले. ज्या वृद्धांना डोळ्याचे ऑपरेशन्स सांगितले, त्यांना मोफत ऑपरेशन करण्याकरीता वेळ देण्यात आली आहे. विशेष म्हणजे हॉस्पिटल मधे ऑपरेशन करिता नेण्याची व परत आणण्याची आणि इतर सर्व व्यवस्था देखील खासदार कृपाल तुमाने यांच्याकडून करण्यात आली आहे.

खासदार तुमाने यांनी शिबिराची पाहणी करत वृद्ध आणि रूग्णांशी संवाद साधला. तसेच नागरिकांच्या समस्याही जाणून घेतल्या. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख संदीप इटकेलवार, जि.प. सदस्य समीर उपम, भाजपा ओबीसी आघाडी जिल्हा अध्यक्ष दिलीप ठाकरे, सतिश रेवतकर, शिवसेना तालुका प्रमुख गंगाधर वंजारी, उपतालुका प्रमुख बंडु काठोळे, संजय भोंडे, सरपंच ललिता मोहन ठाकरे, उपसरपंच हरिषजी उमप, मोहन ठाकरे, विजय बाभूळकर, वैद्यकिय कक्ष समन्वयक सुरेंद्र गिरी यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य आणि परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

खासदार क्रीडा महोत्सव : रस्साखेच स्पर्धेचे उद्घाटन

Wed Jan 17 , 2024
नागपूर :- खासदार क्रीडा महोत्सवांतर्गत मंगळवारी १६ जानेवारी रोजी रस्साखेच स्पर्धेचे उद्घाटन झाले. गाडीखाना मैदानावर सुरू झालेल्या स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी माजी महापौर अर्चना डेहनकर, रामभाउ आंबुलकर, माजी नगरसेवक प्रमोद चिखले, स्पर्धेचे कन्वेनर नागेश सहारे, चौधरी, डांगे आदी उपस्थित होते. उद्घाटनानंतर 15 वर्षाखालील मुलींच्या वयोगटात 380 किलोच्या आतील गटात स्पर्धा झाली. यामध्ये बुटी पब्लिक स्कूल नागपूर, महाराष्ट्र विद्यालय खापरखेडा उमिराज ॲकेडमी […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!