वाठोडा चार्जिंग स्टेशनची आयुक्तांनी केली पाहणी

– १५० बसेसच्या चार्जिंगची सुविधा सज्ज

नागपूर :- नागपूर महानगरपालिकेच्या ‘आपली बस’ सेवेतील ई-बसेससाठी वाठोडा येथे कार्यान्वित करण्यात आलेल्या चार्जिंग स्टेशनची मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी गुरूवारी (ता.१४) पाहणी केली.

यावेळी अतिरिक्त आयुक्त आंचल गोयल, परिवहन व्यवस्थापक विजय जाधव, व्यवस्थापक प्रशासन विकास जोशी, व्यवस्थापक ऑपरेशन राजीव घाटोळे, पीएमआय इलेक्ट्रो मोबिलिटी सोल्यूशन प्रा.लि.चे अध्यक्ष सी.के. गोयल उपस्थित होते.

१५व्या वित्त आयोगातून पर्यावरणपूरक वाहतूक व्यवस्थेसाठी केंद्र शासनाकडून नागपूर महानगरपालिकेला १४४ नवीन ई-बस देण्यात आलेल्या आहेत. यापैकी ८६ बसेस ‘आपली बस’ सेवेमध्ये तैनात आहेत. या बसेससाठी वाठोडा येथे १०.६ एकर जागेमध्ये डेपो आणि चार्जिंग स्टेशन तयार करण्यात आले आहे.

या बसेसच्या संचालनाची जबाबदारी पीएमआय इलेक्ट्रो मोबिलिटी सोल्यूशन प्रा.लि. यांचेकडे देण्यात आली आहे. पीएमआय मार्फत या जागेवर १५० बसेसच्या पार्कींगची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच चार्जींगसाठी २२ स्टेशन तयार करण्यात आले असून यावर एकावेळी ४४ बसेसची चार्जींग करण्याची सुविधा आहे. या संपूर्ण परिसराची मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी पाहणी केली.

वाठोडा डेपो आणि चार्जिंग स्टेशनमध्ये प्रकाश व्यवस्था करण्यात आली असून संपूर्ण परिसरामध्ये देखील प्रकाश व्यवस्था करणे, बसेसची सर्व्हिसींग करण्यासाठी निर्माण करण्यात येत असलेले बांधकाम, चालकांसाठी बसण्याचे शेड, पिण्याच्या पाण्याची व्यवस्थेचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्याचे निर्देश आयुक्तांनी यावेळी दिले. पीएमआय इलेक्ट्रो मोबिलिटी सोल्यूशन प्रा.लि.द्वारे वाठोडा डेपो आणि चार्जिंग स्टेशनमध्ये सुविधांबाबत सुरू असलेल्या कामांबाबत आयुक्तांनी समाधान व्यक्त केले.

यावेळी परिवहन विभागाचे स्थापत्य उपअभियंता केदार मिश्रा, यांत्रिकी अभियंता योगेश लुंगे, प्रकल्प सल्लागार मेहुल रानडे, पीएमआय चे उपाध्यक्ष प्रवीण श्रीवास्तव, वरिष्ठ व्यवस्थापक अमरदीप शर्मा, डेपो व्यवस्थापक अभिजीत नलावडे उपस्थित होते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

मौदा तालुक्यात दहा धान खरेदी केंद्रांना मंजुरी

Fri Nov 15 , 2024
कोदामेंढी :- नागपूर जिल्हा पणन अधिकारी व जिल्हा धान खरेदी समन्वय समिती ने किसान आधारभूत किंमत योजनेअंतर्गत मौदा तालुक्यातील दहा ठिकाणी धान खरेदी केंद्रांना मान्यता दिली आहे,असे संबंधित विभागातील कर्मचाऱ्यांनी सांगितले .यामध्ये कल्पना सहकारी भात गिरणी मर्यादित महादूला ,रेवराल ,चाचेर , निमखेडा ,खात .तालुका सहकारी खरेदी विक्री संस्था मर्यादित मौदा, जय किसान बेरोजगार सहकारी संस्था धानोली, सोहम सुशिक्षित बेरोजगार सहकारी […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!