जिल्हाधिका-यांची अशोक लेलॅड कंपनीला भेट, प्रशीक्षणार्थ्यांशी संवाद

भंडारा :- शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था लाखनी ,येथील जोडारी व्यवसाय या प्रशिक्षणाची विदयार्थ्याची बॅच अशोक लेलँड गडेगांव येथे प्रशिक्षण्‍ घेत आहेत.

या ट्रेनिंग मध्ये एकूण 17 प्रशिक्षणार्थी प्रशिक्षण घेत असून यामध्ये 5 मुलींचा सहभाग आहे. अशोक लैलँड गडेगांव येथे प्रशिक्षण घेत असलेल्या प्रशिक्षणार्थींना काल जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर व शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था लाखनी प्राचार्या. जे. व्ही. निंबार्ते, जिल्हा कौशल्य विकास व उद्योजकता विभागाचे अधिकारी, जिल्हा उद्योग केंद्राचे अधिकारी यांनी अशोक लेलॅड कंपनीला भेट दिली.यावेळी अशोक लेलॅडचे रमाकांत शर्मा, रमेश घारगे तसेच उत्पादन प्रमुख एम.जी.देशमुख उपस्थित होते.

या कंपनीच्या कामकाजाची विस्तृत माहिती शर्मा यांनी जिल्हाधिका-यांना दिली.

प्रशिक्षणार्थ्याना ऑन जॉब ट्रेनींग तसेच सीएनसी मशीनवरील कामे,तसेच प्रशिक्षणार्थ्याचा प्रशिक्षण कालावधी आणी कौशल्य विकास तसेच प्रत्यक्ष जॉब करतांना आवश्यक असलेले अन्य तांत्रीक बाबीविषयी जिल्हाधिका-यांनी प्रशिक्षणार्थ्याशी संवाद साधला.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

डॉ.आंबेडकर सांस्कृतिक भवन (अंबाझरी) परिसरात १४ एप्रिल डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती पर्यंत, स्मारकाची पाय उभारनी करा - नारायण बागडे

Tue Feb 13 , 2024
नागपूर :- अंबाझरी उद्यान येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक निर्माण करण्यासाठी आंबेडकरी समाजातील सर्व स्तरातील महिला पुरुष कार्यकर्तांनी नागपूर शहरात मोठ मोठे आंदोलन केले या आंदोलनाची दखल शासनाने घेवून खालील समितीची नेमणूक केली. तक्रारी बाबत चौकशी करून वस्तुस्थितीदर्शक अहवाल शासनास सादर करण्याबाबत विभागीय आयुक्त नागपूर यांना अहवाल सादर करण्याबाबत कळविले आहे. त्यानुसार दि.१ मार्च २०२३ रोजी विभागीय आयुक्त नागपूर विभाग […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com