प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या लाभार्थ्यांनी 15 जुलैपर्यंत खाते आधार संलग्न करावे – जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

नागपूर :-  प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेंतर्गत ज्या नोंदणीकृत पात्र लाभार्थ्यांनी अद्यापही  बँक खाते आधार संलग्न केलेली नाहीत, त्यांनी ती 15 जुलैच्या आत  करावी. जेणेकरुन त्यांना मिळणारा योजनेचा लाभ त्यांना पूर्ववत मिळेल, असे आवाहन जिल्हाधिकारी आर. विमला यांनी केले आहे.

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेंतर्गत जिल्ह्यात 1 लाख 92 हजार 650 नोंदणीकृत लाभार्थ्यांपैकी 1 लाख 57 हजार 120  नोंदणीकृत लाभार्थ्यांचा डाटा पी.एम. किसान पोर्टलवर एनपीसीआयशी लिंक असून उर्वरित 33 हजार 520 लाभार्थ्यांचा डाटा एनपीसीआयशी लिंक नाही. ज्या लाभार्थ्यांचा डाटा आधार लिंक नसेल अशा लाभार्थ्यांना ऑगस्ट 2022 नंतरचे हप्ते अदा होणार नाही.

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेंतर्गत जिल्ह्यातील 1 लाख 92 हजार 650 नोंदणीकृत लाभार्थ्यांना ऑगस्ट 2022 नंतर जमा होणारे सर्व हप्ते हे आधार संलग्न बँक खात्यात अदा करण्यात येणार असल्याने सर्व लाभार्थ्यांची बँक खाती तत्काळ अधार संलग्न करण्याचे निर्देश शासनाने दिले आहेत.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

479 किलोग्रॅम प्रतिबंधित खर्रा पन्नी जप्त

Tue Jul 12 , 2022
मे. जगदंबा ओव्हरसीजला 5 हजाराचा दंड नागपूर : महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने  आज  मे. जगदंबा ओव्हरसीज, प्लाट नं.11, खसरा नं.22, अमरावती रोड, हिरणवार ले-आऊट, वाडी, नागपूर-23 येथील गोडावूनमध्ये आकस्मीकपणे प्रत्यक्ष पाहणी केली असता, सदर गोडावून परिसरात 479 किलोग्रॅम प्रतिबंधित प्लास्टीक खर्रा पन्नी साठवलेली आढळून आली असून मंडळामार्फत 479 किलोग्रॅम खर्रा पन्नी जप्त करण्यात आली आहे. त्याचबरोबर सदर गोडावूनवर प्राथमिक गुन्हा दंड 5 हजार […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!