विशेष मोहिम २.० अंतर्गत केंद्रीय दूरसंचार विभागाच्या परवाना सेवा क्षेत्र नागपूर युनिट द्वारा स्वच्छता अभियान

नागपूर :-  केंद्र शासनाच्या विशेष मोहिम २.० च्या अनुषंगाने 2 ऑक्टोबर ते 31 ऑक्टोबर 2022 या कालावधीत नागपूरच्या खामला टेलिफोन एक्स्चेंज बिल्डिंग स्थित केंद्रीय दूरसंचार विभागाच्या अधीन महाराष्ट्र एलएसए -परवाना सेवा क्षेत्र नागपूर युनिटद्वारे रेकॉर्ड मॅनेजमेंट, स्वच्छता मोहीम, स्पेस मॅनेजमेंट प्लॅनिंग आणि भंगार विल्हेवाट हे उपक्रम राबवून कार्यालय परिसर स्वच्छ करण्यात आला. या अभियानाअंतर्गत 1400 हून अधिक फायलींचे पुनरावलोकन केले गेले आणि सुमारे 1100 फायली वेगळ्या करण्यात आल्या. अनेक जुन्या आणि कालबाह्य झालेल्या 35 हून अधिक आयटी वस्तू ज्या विल्हेवाटीसाठी प्रलंबित होत्या त्या देखील भंगारात टाकल्या गेल्या आणि त्यांची योग्य प्रकारे विल्हेवाट लावली गेली.  केंद्र शासनाच्या विशेष मोहिम २.० अंतर्गत शासकीय कार्यालयांमध्ये स्वच्छता आणि प्रलंबित बाबींचा निपटारा करण्यासाठी विशेष मोहीम हाती घेण्याचा निर्णय घेतला आहे. या विशेष मोहिमेकरीता प्रशासकीय सुधारणा आणि सार्वजनिक तक्रार विभाग –डीएआरपीजी नोडल विभाग म्हणून नियुक्त करण्यात आला असून यात केंद्र सरकारच्या सर्व मंत्रालयांचा समावेश असून विभाग आणि त्यांची संलग्न/ अधीनस्थ कार्यालये देखील यात समाविष्ट आहेत.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

Special Campaign 2.0 undertaken by MH LSA Nagpur  

Wed Nov 2 , 2022
Nagpur :-  Special Campaign 2.0 is being undertaken by Nagpur Unit of Maharashtra LSA (License Service Area) , Department of Tele Communications, Ministry of Communications ,Government of India during the month of October, 2022 from 2nd October – 31st October, 2022.The campaign involved inter-alia identification of sites at office location 2nd Floor, Khamla Telephone Exchange Building for record management, cleanliness […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com