सारथी’ संस्थेमार्फत ४७ गड-किल्यांची स्वच्छता

पुणे :- छत्रपती शिवाजी महाराज जयंतीचे औचित्य साधून सारथी संस्थेमार्फत सरदार हिरोजी इंदलकर सारथी किल्ले संवर्धन उपक्रमाअंतर्गत राज्यातील ४७ गड किल्यांवर स्वच्छता मोहिम राबविण्यात आली. संस्थेचे अध्यक्ष अजित निंबाळकर व मान्यवरांच्या उपस्थित लाल महाल येथे छत्रपती शिवाजी महाराज व राजमाता जिजाऊ माँसाहेब यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन सरदार हिरोजी इंदलकर सारथी किल्ले संवर्धन उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला.

स्वच्छता मोहिमेत संस्थेचे स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे विद्याथी, कौशल्य विकास अंतर्गत एमकेसीएल मध्ये प्रशिक्षण घेणारे विद्यार्थी, सातारा व कोल्हापूर येथील शालेय विद्यार्थी अशा ८ हजार ५८६ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. सारथी संस्थेमार्फत प्राधिकृत १५ प्रशिक्षण संस्थांनीही यामध्ये सहभाग नोंदवला. किल्ले स्वच्छता उपक्रमात विद्यार्थ्यांनी ११ हजार ९९८ प्लास्टीकच्या बाटल्या, ६४५ काचेच्या बाटल्या व ६ हजार ९२३ प्लास्टिक पिशव्या गोळा केल्या. हा सर्व कचरा २१२ गोण्यांमध्ये भरुन नगरपालिकेकडे व प्लास्टीक प्रक्रिया करणाऱ्या कारखान्यांकडे देण्यात आला.

रायगड, रायरेश्वर, शिवनेरी, पुरंदर, सिंहगड, राजगड, लालमहल, शनिवारवाडा, बालापूर, बदूर, खर्डा, देवगिरी, गाविलगड, किल्ले धारुर, माणिकगड, गोंडराजा, माहूरगड, प्रतापगड, वसंतगड, कल्याणगड (नंदगिरी), मल्हारगड, सिंधुदूर्ग, भोईकोट, मच्छिंद्रगड, बाणूरगड, रामपूर, सिंदखेडराजा, रत्नदुर्ग, लिंगाणा, पन्हाळा, भुदरगड, विशाळगड, अजिंक्यतारा, चंदन, वंदन, रामशेज, नगरधनगड, तोरणा इत्यादी गड किल्यांवर ‘सप्तपदी स्वच्छतेची’ व ‘स्वच्छ भारत अभियान’अंतर्गत स्वच्छता मोहिम राबविण्यात आली.

सारथी प्रायोजित एच.व्ही.देसाई कॉलेजच्या ३७० विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज शिवजन्मोत्सव सोहळा २०२४ रथोत्सव मार्गावर स्वच्छता मोहिम राबविली. तसेच छत्रपती संभाजीनगर येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरात स्वछता करण्यात आली. या किल्ले संवर्धन उपक्रमातील विद्यार्थ्यांना सारथी संस्थेमार्फत सहभाग प्रमाणपत्र व स्वच्छता करत असताना बनविलेल्या उत्कृष्ट रिल्स, शॉर्ट व्हिडीओ इत्यादी बक्षीस म्हणून देण्यात येणार असून यानिमित्तने एच.व्ही.देसाई कॉलेज येथे मान्यवरांच्या उपस्थित राजगडावरील माहिती देणारी चित्रफीत दाखविण्यात आली

उपक्रमास सारथी संस्थेचे संचालक उमाकांत दांगट, नवनाथ पासलकर, मधूकर कोकाटे, नानासाहेब पाटील, व्यवस्थापकीय संचालक अशोक काकडे व सारथीचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. या उपक्रमाविषयी बोलताना संस्थेचे व्यवस्थापकीय संचालक श्री. काकडे यांनी सरदार हिरोजी इंदलकर सारथी किल्ले संवर्धन उपक्रमामध्ये गड किल्ले परिसरात स्वच्छतेसोबतच लक्षित गटाच्या विद्यार्थ्यांसाठी टुरिस्ट गाईड प्रशिक्षण सारथी मार्फत देण्याचे नियोजित असल्याचे सांगितले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

महिलांचा मतदारांचा टक्का वाढविण्यासाठी चिंचवडमध्ये विशेष मोहिम

Fri Mar 1 , 2024
पुणे :- पिंपरी-चिंचवड महानगरपालिका व जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने प्रा. रामकृष्ण मोरे सभागृहात पिंपरी-चिंचवड शहरातील तिन्ही विधानसभा मतदार संघातील महिला मतदारांचे प्रमाण वाढवण्याच्या दृष्टिकोनातून महिलांना ईव्हीएमचे प्रशिक्षण देण्यात आले. तसेच चिंचवड विधानसभा मतदार संघामार्फत महिलांना मार्गदर्शन करण्यात येऊन महिलांना मतदान करण्याची शपथ देण्यात आली. या उपक्रमात मावळ लोकसभा मतदारसंघाअंतर्गत असलेल्या तिन्ही विधानसभा मतदार संघानी सहभाग घेतला. कुटुंबातील […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com