चंद्रपूर: शहर महानगरपालिकेच्या झोन क्रमांक एक, दोन आणि तीन अंतर्गत 29 शौचालये सार्वजनिक आहेत. यातील दहा सार्वजनिक शौचालये “पे अँड युज” तत्त्वावर चालवण्यासाठी मनपाच्या विचाराधीन होते. त्यातील दहा स्वच्छतागृहांमध्ये प्रति शौचविधीकरिता पाच रुपये शुल्क आकारणीला स्थायी समिती बैठकीत मंजुरी देण्यात आली.
स्थायी समिती सभापती संदीप आवारी यांच्या अध्यक्षतेखाली 28 डिसेंबर रोजी स्थायी समिती सभागृहात बैठक पार पडली. यावेळी सर्व समिती सदस्यांची उपस्थिती होती.
महानगरपालिकेच्या मार्फतीने सध्या करण्यात आलेल्या 29 सार्वजनिक शौचालयांपैकी दहा ठिकाणी सेवा शुल्क आकारण्यात येणार आहे.
यात संजय गांधी मार्केट, बाजार कांझी, टिळक मैदान, राजकला टॉकीज, आजाद बगीचा, सामान्य रुग्णालय, गंज मार्केट, प्रशासकीय भवन, बंगाली कॅम्प मार्केट साधी सुलभ शौचालय यांचा समावेश आहे.
नागरिकांसाठी निशुल्क असलेल्या सार्वजनिक शौचालयांमध्ये जटपुरा सुलभ शौचालय, अक्सा मस्जिद, सपना टॉकीज, चोर खिडकी, हनुमान मंदिर नगीनबाग, तार ऑफिस, बिनबा गेट, अंचलेश्वर गेट, सुदर्शन मोहल्ला, महाकाली मंदिर, गौतम नगर, हनुमान खिडकी, राजीव गांधी नगर (तुळजा भवानी), बुरडकर सुलभ शौचालय, मजदूर चौक, गोंधळी पुरा, काशीबाई चहारे सुलभ शौचालय, मनपा दवाखाना आदींचा समावेश आहे.