जनहिताची कामे अडकू नये म्हणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा निर्णय मंत्री, राज्यमंत्री यांच्याकडील खात्यांचे फेरवाटप

   मुंबई, दि. 27 : जनहिताची कामे अडकून न राहता ती अविरतपणे सुरू राहण्यासाठी तसेच सध्या सुरू असलेल्या पावसाळ्यात अतिवृष्टी  होणे, आपत्तीच्या घटना अशा परिस्थितीत विभागांची कामे सुरळीतपणे पार पाडण्यासाठी अनुपस्थित पाच मंत्री आणि चार राज्यमंत्री यांच्याकडील खाती इतर मंत्र्यांना सोपविण्याचा  निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतला आहे.

            महाराष्ट्र शासन कार्यनियमावलीतील नियम 6-अ मध्ये 6-अ अनुपस्थिती, आजारपण किंवा इतर कोणत्याही कारणामुळे आपली कामे पार पाडणे शक्य नसेल त्यावेळी मुख्यमंत्र्यांस आपल्या अनुपस्थितीत आपली सर्व किंवा कोणतीही कामे पार पाडण्याबाबत इतर कोणाही मंत्र्यास निर्देश देता येईल. त्याचप्रमाणे जेव्हा एखाद्या मंत्र्याला आपली कामे पार पाडणेशक्य नसेल तेव्हा त्या मंत्र्याच्या अनुपस्थितीत मुख्यमंत्र्यास इतर कोणाही मंत्र्याला त्याची सर्व किंवा काही कामे पार पाडण्याबाबत निदेश देता येईल अशी तरतूद आहे त्याप्रमाणे हा निर्णय घेण्यात आला आहे.

            संबंधित मंत्री व राज्यमंत्री यांच्याकडील विभागांचे काम त्यांच्या नांवासमोर दर्शविण्यात आलेल्या मंत्री व राज्यमंत्री यांचेकडे पुढील आदेशापर्यंत सोपविण्यात येत आहे.

मंत्र्याकडील खातेवाटपात  बदल :

            एकनाथ शिंदे  यांच्याकडील नगर विकास, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) खाती सुभाष देसाई यांच्याकडे, गुलाबराव रघुनाथ पाटील यांच्याकडील पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग हे खाते अनिल दत्तात्रय परब यांच्याकडे, दादाजी दगडू भुसे यांच्याकडील कृषि व माजी सैनिक कल्याण खाते तसेच संदिपान आसाराम भुमरे यांच्याकडील (रोजगार हमी, फलोत्पादन खाते शंकर यशवंतराव गडाख यांच्याकडे, उदय सामंत यांच्याकडील उच्च व तंत्र शिक्षण खाते आदित्य ठाकरे यांच्याकडे देण्यात आले आहे

राज्य मंत्र्याकडील खातेवाटपात  बदल :

             शंभूराज शिवाजीराव देसाई यांच्याकडील खाती (कंसात) संजय बाबुराव बनसोडे, राज्यमंत्री (गृह ग्रामीण), विश्वजित पतंगराव कदम, राज्यमंत्री (वित्त, नियोजन, कौशल्य विकास व उद्योजकता, पणन, सतेज उर्फ बंटी डी. पाटील, (रा.उ.शु.),

            राजेंद्र शामगोंडा पाटील यड्रावकर राज्यमंत्री यांच्याकडील खाती (कंसात) विश्वजित पतंगराव कदम, राज्यमंत्री (सार्वजनिक आरोग्य व कुटूंब कल्याण), प्राजक्त प्रसाद तनपुरे, राज्यमंत्री (वैद्यकीय शिक्षण, वस्त्रोद्योग),सतेज उर्फ बंटी डी. पाटील, राज्यमंत्री (अन्न व औषध प्रशासन),आदिती सुनिल तटकरे, राज्यमंत्री (सांस्कृतिक कार्य)

            अब्दुल नबी सत्तार, राज्यमंत्री यांच्याकडील खाती (कंसात) प्राजक्त प्रसाद तनपुरे, राज्यमंत्री (महसूल), सतेज उर्फ बंटी डी. पाटील, राज्यमंत्री (ग्राम विकास), आदिती सुनिल तटकरे, राज्यमंत्री (बंदरे, खार जमिनी विकास, विशेष सहाय्य)

            ओमप्रकाश उर्फ बच्चू बाबाराव कडू, राज्यमंत्री यांच्याकडील खाती(कंसात)  आदिती सुनिल तटकरे, राज्यमंत्री (शालेय शिक्षण), सतेज उर्फ बंटी डी. पाटील, राज्यमंत्री (जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, कामगार), संजय बाबुराव बनसोडे, राज्यमंत्री (महिला व बाल विकास), दत्तात्रय विठोबा भरणे, राज्यमंत्री (इतर मागास बहुजन कल्याण)

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

अग्निपथ योजनेविरुद्ध कामठीत काँग्रेसचे आंदोलन

Mon Jun 27 , 2022
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कामठी ता प्र 28 : केंद्र सरकारच्या अग्निपथ योजनेविरोधात आज कॉंग्रेसने कामठी च्या जयस्तंभ चौकात कांग्रेस चे महाराष्ट्र प्रदेश महासचिव शकुर नागाणी व कांग्रेस शहराध्यक्ष कृष्णा यादव यांच्या नेतृत्वात आंदोलन केले. केंद्र सरकारविरोधात घोषणा देताना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची विचारधारा मानणाऱ्या २५ टक्के तरुणांना या योजनेद्वारे सैन्यात घेतले जाणार असल्याचा आरोपही कांग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश महासचिव ,माजी नगराध्यक्ष […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com