संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- नियमित कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात प्रोत्साहन रक्कम जमा करण्यात आली असून कामठी तालुक्यातील एकूण 944 शेतकरी पात्र लाभार्थी असून यातील पहिल्या यादीतील 115 पैकी 113 लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 55 लक्ष रुपये प्रोत्साहन राशी जमा करण्यात आली असून यानंतर यादीत येणाऱ्या लाभार्थी शेतकऱ्यांना टप्पानिहाय प्रोत्साहन राशी देण्यात येणार आहे त्यासाठी लाभार्थी शेतकऱ्यांनी आधार लिंक करणे आवश्यक आहे.
पीक कर्ज शासन विविध बँकांच्या मार्फत शेतकऱ्यांना उपलब्ध करून देते. बँकांमार्फत शेतकऱ्यांना अल्प,मध्यम व दीर्घ कालावधीचे पीक कर्ज दिले जाते .अल्पमुदतीच्या पीक कर्जावर 1 लाखाच्या मर्यादेत 31 मार्च पर्यंत रक्कम भरल्यास व्याज आकारले जात नाही.3लाख रुपयाच्या पीक कर्जावर 6 टक्के व्याज दराने पिककर्ज दिले जाते यातही वेळेत पीक कर्जाची परतफेड केल्यास शासनातर्फे 2 टक्क्यांची सूट दिली जाते. याच बळावर शेतकरी शेती करतात मात्र कधी आस्मानी तर कधी सुलतानी संकटामुळे अनेक शेतकरी पीक कर्जाची वेळेत परतफेड करू शकत नाही परिणामी त्यांच्यावर कर्जाचे डोंगर वाढत जाते अशा परिस्थितीत कर्जमुक्तीची मागणी सर्वच स्तरावर होते .