अग्निपथ योजनेविरुद्ध कामठीत काँग्रेसचे आंदोलन

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 
कामठी ता प्र 28 : केंद्र सरकारच्या अग्निपथ योजनेविरोधात आज कॉंग्रेसने कामठी च्या जयस्तंभ चौकात कांग्रेस चे महाराष्ट्र प्रदेश महासचिव शकुर नागाणी व कांग्रेस शहराध्यक्ष कृष्णा यादव यांच्या नेतृत्वात आंदोलन केले.
केंद्र सरकारविरोधात घोषणा देताना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची विचारधारा मानणाऱ्या २५ टक्के तरुणांना या योजनेद्वारे सैन्यात घेतले जाणार असल्याचा आरोपही कांग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश महासचिव ,माजी नगराध्यक्ष शकुर नागाणी यांनी केला. यावेळी जयस्तंभ चौकात कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करीत अग्निपथ योजनेला विरोध केला. यावेळी शकुर नागानी यांनी देशातील तरुणांचे भविष्य टांगणीला लावणारी ही योजना असल्याचा आरोप केला.
गांधीजींच्या शांततेच्या मार्गाने आंदोलन करीत आहे. देशातील बेरोजगारांच्या पाठीशी कॉंग्रेस उभी आहे. जोपर्यंत ही योजना मागे घेतली जाणार नाही, तोपर्यंत कॉंग्रेसचे आंदोलन सुरूच राहणार आहे, दिल्लीच्या सीमेवर शेतकऱ्यांनी केलेल्या आंदोलनानंतर कृषी कायदे रद्द करण्यात आले होते, त्याचप्रमाणे ही अग्नीपथ योजनाही रद्द करावी, अशी कॉंग्रेसची मागणी आहे. केंद्र सरकारने हा विषय ताणून धरला, तर आम्ही अखेरपर्यंत पाठपुरावा करू, पण ही अन्यायकारक योजना रद्द करण्यास केंद्र सरकारला भाग पाडू, असे मनोगत माजी नगराध्यक्ष शकुर नागाणी यांनी आजच्या आंदोलनात मनोगत व्यक्त केले.
याप्रसंगी कांग्रेस चे कामठी शहराध्यक्ष कृष्णा यादव,माजी नगराध्यक्ष गुड्डू मानवटकर, माजी नगराध्यक्ष नीरज यादव, प्रमोद गेडाम, फारूक कुरेशी, माजी नगरसेवक सुलेमान अब्बास, मो आरिफ, मनोज यादव, मो सुलतान, राजकुमार गेडाम, राजू बेलेकर, सुरेय्या बानो,ममता कांबळे, आदी कांग्रेस कार्यकर्तेगण मोठ्या संख्येत उपस्थित होते.

Email Us for News or Artical - [email protected]
WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!