मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून मकर संक्रांतीच्या शुभेच्छा

-कोरोनाच्या आव्हानावर मात करून आरोग्याचा गोडवा वाढवूया

  मुंबई  :- मकर संक्रांत आपल्याला संक्रमण आणि बदल स्वीकारण्याचा संदेश देते. त्यासाठी आपण परस्परांची काळजी घेत कोरोनाच्या आव्हानात्मक परिस्थितीवर मात करूया आणि या संक्रमणातून बाहेर पडून आरोग्याचा गोडवा वाढवूयाअशा शुभेच्छा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मकर संक्रांतीच्या पूर्वसंध्येला राज्यातील जनतेला दिल्या आहेत.

            मुख्यमंत्री श्री.ठाकरे म्हणतात कीपृथ्वी आणि सूर्याचं हे नातं आपल्याला संक्रमणाला सामोरे जाण्यास शिकवते. जगावर गेले दोन वर्षे कोरोना विषाणूचे संकट घोंघावते आहे. यातही आपण संसर्गाची साखळी तोडण्याचा प्रयत्न करत पुढे जात आहोत. उद्या साजऱ्या होणाऱ्या मकर संक्रांतीकडूनही आपण हाच संदेश घेऊया. परस्परांची काळजी घेऊया. गर्दी टाळूया.  एकमेकाला आरोग्यदायीसमृद्ध जीवनासाठी शुभेच्छा देऊया. सर्वांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा!

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

News Today 24x7

Next Post

अवकाळी पाऊस व गारपीटग्रस्त भागाची पाहणी मृताच्या कुटुंबियास  चार लाख देण्याची पशुसंवर्धन मंत्र्यांची घोषणा लोकप्रतिनीधी व शासकीय यंत्रणेने समन्वयातून काम करावे- सुनील केदार

Fri Jan 14 , 2022
 नागपूर,दि. 13 : अवकाळी पाऊस व गारपीट अशा नैसर्गिक आपत्तीमुळे नागपूर जिल्ह्यातील अनेक गावांना तडाखा बसला आहे. आज या भागाची पाहणी पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास, क्रीडा व युवक कल्याण मंत्री सुनील केदार यांनी केली. यावेळी लोकप्रतिनिधी व शासकीय यंत्रणेने समन्वयात काम करुन आपत्तीग्रस्तांना मदत करण्याचे निर्देश त्यांनी दिले. यावेळी त्यांनी नागपूर तालुक्यातील बोखारा गावास प्रथम भेट देऊन नैसर्गिक आपत्तीत मृत पावलेल्या […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com