मुंबई :- ‘लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-२०२४ साठी राज्यात प्रशासन सज्ज’ याविषयी मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांची माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ आणि ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात मुलाखत प्रसारित होणार आहे.
राज्यात आदर्श आचारसंहितेची अंमलबजावणी, सर्व टप्प्यातील निवडणुकांसाठी झालेली तयारी, निवडणुकीचे कामकाज पार पडण्यासाठी सुरू असलेली कार्यवाही, मतदान केंद्र व मतमोजणी केंद्रांवर करण्यात आलेली तयारी, मतदार जनजागृती उपक्रम, कायदा व सुव्यवस्था कार्यवाही, माध्यमप्रमाणीकरण समितीचे कामकाज, सर्व घटकातील मतदारांसाठी केलेल्या सोयीसुविधा याबाबत एस. चोक्कलिंगम यांनी ‘दिलखुलास’ आणि ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमातून माहिती दिली आहे. निवेदक शिबानी जोशी यांनी ही मुलाखत घेतली आहे.
माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ कार्यक्रमात मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांची मुलाखत गुरुवार दि. ११ व शुक्रवार दि. १२ रोजी आकाशवाणीच्या सर्व केंद्रावरून व न्यूज ऑन एआयआर’ या मोबाईल अॅपवर सकाळी ७.२५ ते ७.४० या वेळेत प्रसारित होणार आहे. तर ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात ही मुलाखत शुक्रवार दि. १२ एप्रिल २०२४ रोजी सायंकाळी ७.३० वाजता महासंचालनालयाच्या समाजमाध्यमांच्या पुढील लिंकवर पाहता येणार आहे.
महासंचालनालयाच्या समाजमाध्यमांच्या लिंक
एक्स – https://twitter.com/MahaDGIPR
फेसबुक – https://www.facebook.com/MahaDGIPR
यूट्यूब – https://www.youtube.co/MA
HARASHTRADGIPR