चंद्रपूर :- चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे थोर समाजसुधारक छत्रपती शाहू महाराज यांची जयंती २६ जुन रोजी मनपा कार्यालयात मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या प्रारंभी आयुक्त व प्रशासक विपीन पालीवाल यांच्या हस्ते राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पांजली अर्पण करण्यात आली. उपस्थितांना मार्गदर्शन करताना आयुक्तांनी छत्रपती शाहू महाराज यांचा शिक्षण व समाज सुधारणेबद्दलचा दृष्टीकोन याबाबत माहिती दिली. याप्रसंगी उपायुक्त रवींद्र भेलावे, उपायुक्त मंगेश खवले,डॉ.नयना उत्तरवार, आशिष जीवतोडे, प्रदीप पाटील तसेच अधिकारी व कर्मचारी उपस्थीत होते.