राजधानीत छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती साजरी

नवी दिल्ली :- स्वराज्य रक्षक, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती महाराष्ट्र सदन व महाराष्ट्र परिचय केंद्रात आज साजरी करण्यात आली.

कोपर्निकस मार्ग स्थित महाराष्ट्र सदनातील सभागृहात आयोजित कार्यक्रमात निवासी आयुक्त व प्रधान सचिव रूपिंदर सिंग यांनी छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले. यावेळी सहायक निवासी आयुक्त डॉ राजेश अडपावार व स्मिता शेलार यासोबत इतर वरिष्ठ अधिका-यांनीही त्यांच्या प्रतिमेस आदरांजली वाहिली.

महाराष्ट्र परिचय केंद्रात छत्रपती संभाजी महाराज यांना अभिवादन

महाराष्ट्र परिचय केंद्रात आयोजित कार्यक्रमात धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांना अभिवादन करण्यात आले. परिचय केंद्राच्या उपसंचालक अमरज्योत कौर अरोरा यांनी प्रतिमेस पुष्प अर्पण करून विनम्र अभिवादन केले. कार्यालयातील उपस्थित कर्मचाऱ्यांनीही यावेळी त्यांना श्रद्धांजली वाहिली.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

अतिक्रमण विरोधात मनपाची सातत्याने कारवाई

Wed May 15 , 2024
चंद्रपूर :- शहरात रस्त्यावर अतिक्रमण करून व्यवसाय थाटणाऱ्या अतिक्रमणधारकांवर चंद्रपूर महानगरपालिका, पोलीस विभाग व वाहतुक पोलीस विभागाद्वारे संयुक्त कारवाई सुरूच असुन नागपुर रोडवरील अतिक्रमण मोठ्या प्रमाणात हटविण्यात आले आहे. गेल्या दोन दिवसांपासुन नागपुर रोडवरील प्रियदर्शिनी चौक ते कुंदन प्लाझा यादरम्यान कारवाई करण्यात येत असुन यादरम्यान अंजीकर मोटर्स,शिवशंकर होंडा या दुचाकी वाहन विक्री करणाऱ्या शोरूम समोर रस्त्यावर ठेवलेल्या ट्रॉली जप्त करण्यात […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com