चंद्रपूर मनपात महाराष्ट्र दिन साजरा

चंद्रपूर :- महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या ६४ व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून बुधवार १ मे रोजी चंद्रपूर महानगरपालिका मुख्यालयात मनपा आयुक्त तथा प्रशासक विपीन पालीवाल यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

याप्रसंगी आयुक्तांनी सर्व अधिकारी,कर्मचारी व शहरातील सर्व नागरिकांना महाराष्ट्र दिनाच्या तसेच शहराच्या विकासाकरीता राबणाऱ्या सर्व कामगारांना कामगार दिनाच्या शुभेच्छा दिल्या. कार्यक्रम प्रसंगी राष्ट्रगीत तसेच महाराष्ट्राचे राज्यगीताचे सामुहिक गायन करण्यात आले. कामगार दिन आणि महाराष्ट्र दिन असा संयुक्त कार्यक्रम साजरा करण्यात येऊन महाराष्ट्राची गौरव गिते वाजविण्यात आली.

याप्रसंगी मनपाचे अतिरिक्त आयुक्त चंदन पाटील,उपायुक्त मंगेश खवले, सहायक संचालक नगर रचना सुनील दहीकर, मुख्य लेखाधिकारी मनोहर बागडे, मुख्य लेखा परीक्षक मनोज गोस्वामी, शहर अभियंता अनिल घुमडे, उपअभियंता विजय बोरीकर,रवींद्र हजारे,सहायक आयुक्त नरेंद्र बोबाटे यांच्यासह सर्व कर्मचारी व अधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

पासष्टावा महाराष्ट्र राज्य स्थापना दिन: राज्यपालांची राष्ट्रध्वजाला मानवंदना

Thu May 2 , 2024
मुंबई :- महाराष्ट्र राज्याच्या पासष्टाव्या स्थापना दिनानिमित्त राज्यपाल रमेश बैस यांनी बुधवारी (दि. १ मे) छत्रपती शिवाजी महाराज उद्यान मुंबई येथे झालेल्या मुख्य शासकीय सोहळ्यात राष्ट्रध्वज फडकावला व जनतेला उद्देशून संदेश दिला. यावेळी राज्यपालांनी समारंभीय संचलनाचे निरीक्षण केले तसेच संचलनाकडून मानवंदना स्वीकारली. राज्यपालांच्या भाषणाच्या मराठी, इंग्रजी व हिंदी प्रती जोडल्या आहेत. मुख्य शासकीय सोहळ्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मुंबई उपनगर जिल्ह्याचे […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com