चंद्रपूर मनपा आरोग्य विभागास तिसरे मानांकन राष्ट्रीय आरोग्य अभियानाची गुणप्रणाली  

  चंद्रपूर :- सार्वजनिक आरोग्य विभागाअंतर्गत राबविण्यात येणाऱ्या राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या गुणप्रणालीद्वारे चंद्रपूर महानगरपालिका वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. वनिता गर्गेलवार यांच्या अधिनस्त आरोग्य विभागाने उत्कृष्ट वैद्यकीय सेवांसाठी राज्यातील २७ महानगरपालिकांमध्ये तिसरा क्रमांक प्राप्त केला आहे.

चंद्रपूर शहरात वैद्यकीय सेवा देण्यास वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. वनिता गर्गेलवार यांच्या नेतृत्वात शहर कार्यक्रम व्यवस्थापक डॉ.नरेंद्र जनबंधु, डॉ.अश्विनी भारत, डॉ.नयना उत्तरवार, डॉ.विजया खेरा, डॉ.जयश्री वाडे, डॉ.योगेश्वरी गाडगे, डॉ.अर्वा लाहिरी, डॉ. प्राची खैरे तसेच समस्त आरोग्य कर्मचारी कार्यरत आहेत. ७ प्राथमिक आरोग्य केंद्रांद्वारे विविध आरोग्यसेवा प्रदान करण्यात येतात.

राज्यात जिल्हा स्तरावर जिल्हा शल्य चिकित्सक आणि जिल्हा आरोग्य अधिकारी तर महानगरपालिका स्तरावर मनपा वैद्यकीय आरोग्य अधिकारी यांच्या अधिनस्त आरोग्य संस्थांकडुन आरोग्य सेवा दिल्या जातात. सदरील आरोग्य सेवांचा आढावा घेण्यासाठी / माहिती मिळण्यासाठी राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत निर्देशांक निश्चित करण्यात आले आहे. या निर्देशांकानुसार आरोग्य सेवांच्या अद्ययावत परिस्थितीचे जिल्ह्यांना / महानगरपालिकांना आकलन व्हावे यासाठी राज्यातील सर्व जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी, मनपा वैद्यकीय आरोग्य अधिकारी यांचे रँकींग करण्यात येते. जुलै २०२२ महीन्यातील रँकिंगमधे डॉ. वनिता गर्गेलवार चंद्रपूर मनपा वैद्यकीय आरोग्य अधिकारी यांनी तिसरा क्रमांक प्राप्त केला आहे.

शासनामार्फत दिल्या जाणाऱ्या आरोग्य सेवांमध्ये अधिक सुधारणा व्हावी, कामात काही त्रुटी असतील तर त्या समजाव्या आणि त्यानुसार सुधारणा करण्यासाठी योग्य नियोजन व्हावे, आरोग्यविषयक कार्यक्रमनिहाय महत्वाच्या निर्देशकांचा समावेश करून या उद्देशाने सदर रँकींग पद्धती सुरु करण्यात आली आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

विलय दिवस के मौके पर गढ़चिरौली पुलिस को बड़ी सफलता। 06 लक्ष ईनामी 02 जहाल नक्सलीयों का आत्मसमर्पण 

Wed Sep 21 , 2022
गढ़चिरौली :-  सरकार द्वारा जारी किये गये आत्मसमर्पण योजना के तहेत तथा विभिन्न मुटभेड़ो में नक्सलीयों का किया गया खात्मा एवं हिंसा के जीवन को परेशान हुए वरिष्ठ नक्सलीयो सहीत कई नक्सलीयों ने आज तक आत्मसमर्पण किया है। उसी के चलते आत्मसमर्पीत नक्सलीयों का गढ़चिरौली पुलिस द्वारा पुनर्वास योजना के तहत नक्सली बड़ी मात्रा में आत्मसमर्पण कर रहे है। हाल […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com