चंद्रपूर शहरातील ९५ टक्के नागरिकाची कोविड लसीची पहिली मात्रा पूर्ण  

चंद्रपूर, ता. २० : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी चंद्रपूर महानगरपालिकेमार्फत शहरात विविध ठिकाणी लसीकरण केंद्र सुरु करून कोरोना प्रतिबंधक लस दिली जात आहे. शहरातील १०० टक्के नागरिकांचे लसीकरण करण्यासाठी महानगरपालिकेच्या माध्यमातून विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. चंद्रपूर शहरातील ९५ टक्के म्हणजेच २ लाख २८ हजार ३४७ नागरिकांनी लसीची पहिली मात्रा घेतली. यातील ५९ टक्के नागरिकांनी लसीची दुसरी मात्रा देखील घेतली आहे.

चंद्रपूर महानगरपालिकेने लसीकरणाची टक्केवारी वाढविण्यासाठी लसीकरण आपल्या दारी, लस घ्या आणि खरेदीत मिळवा सवलत, धार्मिक प्रार्थनास्थळी लसीकरण मोहीम, लस नाही तर ऑटोत प्रवेश नाही, दुकानांवर लाल स्टिकर मोहीम, युवा स्वास्थ्य मिशन लसीकरण मोहीम, हर घर दस्तक आदी विविध योजना राबविण्यात आल्या. या माध्यमातून लसीकरणाची टक्केवारी वाढविण्यात मदत झाली.


कोरोनाला हद्दपार करण्यासाठी १६ जानेवारी २०२१ पासून प्रतिबंधक लसीकरण मोहीम सुरु झाली. प्रारंभी आरोग्य सेवेतील व्यक्तींना मात्रा देण्यात आली. दुसऱ्या टप्प्यात फ्रंटलाईन वर्कर म्हणून काम करणाऱ्या पोलिस, महसूल व इतर अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्याचे लसीकरण झाले. तिसऱ्या टप्प्यात १ एप्रिलपासून ४५ ते ६० वर्ष वयोगटातील नागरिकांना लस देण्याचे धोरण शासनातर्फे अवलंबण्यात आले. २ मेपासून १८ ते ४४ वयोगातील व्यक्तींना लसीकरण सुरु करण्यात आले. उर्वरित नागरिकांनी तात्काळ लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन मनपाने केले आहे.

वयोगट—————पहिली मात्रा ——-दुसरी मात्रा  



हेल्थ वर्कर ————–६४८४—————५८८३
फ्रंटलाईन वर्कर———-७२१३—————६८८२
१८ ते ४४ वर्ष ———-१२५८८७————७२०८०
४५ ते ५९ वर्ष ———-५७७५२————-४०४६०
६० वर्षावरील————३१०११—————-२१८८९

पहिली मात्रा : २२८३४७
दुसरी मात्रा :  १४७१९४

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

News Today 24x7

Next Post

भारतमातेचे म्यूरल देणार देश सेवेची प्रेरणा : महापौर दयाशंकर तिवारी

Mon Dec 20 , 2021
गंजीपेठ येथे भारतमातेच्या म्यूरलचे अनावरण नागपूर, ता. २० : देशभरात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा केला जात आहे. नागपूर शहरामध्येही याच अनुषंगाने स्वातंत्र्याचा जागर सुरू असून देशाभिमान बाळगणारे अनेक कार्य सुरू आहेत. त्याच संकल्पनेतून भारतमातेचे म्यूरल साकारण्यात आले आहे. भारतमातेचे हे म्यूरल शहरातील तरुणांना देशसेवेची प्रेरणा देईल, असा विश्वास महापौर दयाशंकर तिवारी यांनी व्यक्त केला.             स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या अनुषंगाने महापौर दयाशंकर तिवारी यांच्या संकल्पनेतून […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com