नागपूर :- महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या जयंती निमित्त मंगळवारी नागपूर महानगरपालिकातर्फे विनम्र अभिवादन करण्यात आले. मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी मनपा मुख्यालयात आयोजित कार्यक्रम मध्ये स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या तैलचित्राला माल्यार्पण करुन विनम्र अभिवादन केले. या वेळी अतिरिक्त आयुक्त आंचल गोयल, मुख्य अभियंता राजीव गायकवाड, उपायुक्त निर्भय जैन, सहायक आयुक्त महेश धामेचा, अधिक्षक अभियंता श्वेता बॅनर्जी, उद्यान अधिक्षक अमोल चौरपगार, जनसंपर्क अधिकारी मनिष सोनी,अमोल तपासे उपस्थित होते.