संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कन्हान :- कांद्री रहिवासी नामदेव कांबळे हे सिंमेट खरेदी करिता पारस टेड्रर्स कांद्री येथे जावुन दुकाना सामोर दुचाकी उभी करून सिंमेट बो-याचा ऑडर देऊन परत येत पर्यंत कुणीतरी अज्ञात चोरटयाने हिरो होंडा दुचाकी चोरून नेल्याने कन्हान पोस्टे ला फिर्यादी च्या तक्रारीवरून अज्ञात आरोपी विरूध्द चोरीचा गुन्हा दाखल करून कन्हान पोलीस आरोपी चा शोध घेत आहे.
मंगळवार (दि.१२) सप्टेंबर २०२३ ला नामदेव उमाजी कांबळे वय ४४ वर्षे, रा. वार्ड क्र.२ कांद्री हे त्यांचा भासा अमोल मेहर वय ३० वर्षे रा. कांद्री याची काळया रंगाची मोटर साईकल हिरो होडा स्पेलंडर क्रं. एमएच ४० एपी ०९०६ ने १२ वाजता सिमेट खरीदी करण्याकरीता पारस टेड्रर्स कांद्री ला मित्र जगजीवन बर्वे रा.साटक यांचे सोबत जाऊन दुचाकी दुकानाच्या सामोर उभी करून पारस टेड्रर्स मध्ये सिमेट खरीदी करण्याकरिता गेलो होतो. तेव्हा दुचाकीला हेडल लॉक न लावता दुचाकी ला चाबी लावली होती. दुकानात २० बोरी सिमेंट ऑर्डर देवुन दुकान मालकाने सिमेट घरी पाठवुन देतो म्हटल्याने अंदाजे ४५ मिटाने दुचाकी जवळ परत आलो असता दुचाकी जागेवर दिसली नसल्याने आजु बाजुला शोध घेतला तरी मिळुन न आल्याने ती चोरी झाल्याचे लक्षात आल्याने फिर्यादी नामदेव उमाजी काबळे यांनी कन्हान पोलीस स्टेशन गाठुन हिरो होडा स्पेलंडर दुचाकी क्रं. एमएच ४० ए पी ०९०६ किमत १५००० रूपये चा चेचीस क्र. एमबीएलएचए१०बीएफइ एचएम५२११३, इंजन नं. एचए१०इआरइएचएम८५४८१ असा असुन कोणी तरी अज्ञात चोराने दुचाकी पारस ट्रेडर्स कांद्री सामोरून चोरून नेल्याने पो स्टे कन्हान ला तकार दिल्याने पो. हवा उमाशंकर पटेल यानी पोलीस निरिक्ष क सार्थक नेहते यांचा मार्गदर्शनात अप क्रं. ५९८/२०२३ कलम ३७९ भादं वि. अन्वये अज्ञात आरोपी विरूध्द गुन्हा दाखल करून पुढील तपास करित आरोपीचा शोध घेत आहे.