– प्रक्षोभक वक्तव्याचा पीपल्स रिपब्लिकन पार्टीचा निषेध
मुंबई/नागपुर :- डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाद्वारे जगात नावलौकिक असलेली न्यायव्यस्थता तयार केली आहे. आज जगभरातील शेकडो देश भारताच्या संविधानाला आत्मसात करीत आहेत आणि आपल्या देशात लोकशाही टिकविण्याचे काम करीत आहे. अशातच भारताच्या न्याय व्यवस्थेत निकालात जातीयतेचा गंध येत असल्याची गरळ नागपुरात जितेंद्र आव्हाडांनी ओकली. मुळात न्याय व्यवस्थेतील निकाल आव्हांडा हिताशी लागत नसल्यानेच प्रक्षोभक भाष्य आव्हाड करीत आहे. जगातील सर्वोच्च मानल्या जाणाऱ्या न्याय व्यवस्थेवर बोट उचल्याचे शहाणपण सांगू नये, असा आरोप पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष जयदीप कवाडे यांनी केला.
प्रसिद्धी पत्रकाद्वारे बोलताना जयदीप कवाडे म्हणाले की, केंद्रासह राज्यात महायुती सरकार लोकाभीमूख आणि जनहितार्थ काम करीत आहे. सत्ता गेल्यानंतर आगामी लोकसभेत सुद्धा महायुती सरकारचा येणार असल्याचे जितेंद्र आव्हाडांची झोप उडाली आहे. त्यामुळे त्यांना प्रकाश झोतात येण्यासाठी आव्हाड बैताल वक्तव्य करीत असल्याची प्रचिती नागपुरात पाहायला मिळाली. लोकप्रियता मिळवण्यासाठी ते बेताल वक्तव्य करीत आहेत. यांना कोणी विचारत नसल्याने यानिमित्ताने तरी आपण चर्चेत राहू, यासाठी हा खटाटोप आहे. आव्हाड कधी प्रभु श्री रामांच्या विषयावर आपल्या बिन डोक प्रतिक्रीया देऊन वाद निर्माण करून जातीय तेढ निर्माण करून असहिष्णुतेचे वातावरण तयार करीत आहेत. संविधान निर्माता डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानामध्ये न्यायव्यवस्थेला स्वायत्त ठेवलेले आहे. यामुळे न्यायाधीशाला न्याय देताना जात, धर्म, लिंग, भाषा, वर्ण हा कोणताही विषय समोर येऊ नये म्हणूनच न्यायव्यवस्थेमध्ये आरक्षण नाही. त्यामुळे आव्हाड आपण जे महामानवांच्या बद्दल जे वक्तव्य केले त्याचा पीपल्स रिपब्लिकन पार्टी निषेध करीत असल्याचेही जयदीप कवाडे म्हणाले.