जनआहारमध्ये पाय ठेवताच उष्णतेचा भडका

– प्रचंड तापमानात कसे बसणार प्रवासी

नागपूर :-मध्यवर्ती रेल्वे स्थानकाच्या जनआहारमध्ये पाय ठेवताच गरम वाफ,उष्णतेचा भडका उडाल्यासारखे वाटते. एक मिनीटेही बसता येणार नाही असे आतमधील वातावरण आहे. वारा येण्यास जागा नाही. त्यामुळे कुलर, पंखे असूनही काम करीत नाही. अशा स्थितीत तेथील कामगार आणि भोजनासाठी येणार्‍या प्रवाशांचे काय?

सध्या तापमानाचा पारा 43 अंशावर आहे. त्यातही प्रचंड उकाळा. जनरल कोचमधील प्रवाशांचा तर विचार न केलेलाच बरा. सुर्याची आग आणि छताची उष्णता त्यात भर घालते. घामाचे लोट निघत असताना जनरल डब्यात खचाखच प्रवासी असतात. प्रवाशांना उष्णतेपासून काही वेळ दिलासा मिळावा याहेतून मध्य रेल्वे प्रशासनाने मिस्ड कुलिंग यंत्रणेची व्यवस्था प्लॅटफार्म क्रमांक एकवर केली. ही यंत्रणा साधारण मे महिण्याच्या मध्यंतरी सुरू होते. पाईपमधून निघणारे थंड पाण्याचे फव्वारे अंगावर पडताच प्रवाशांना दिलासा मिळतो. मात्र, अजूनही ती यंत्रणा सुरू करण्यात आली नाही.

जनरल आणि स्लीपर डब्यातून प्रवास करणार्‍यांना मिस्ड कुलिंगचा आनंद मिळतो. प्लॅटफार्म एकवर प्रवाशांची वर्दळ असते. याच ठिकाणी जनआहार आहे. येथे माफक दरात खाद्य पदार्थ आणि भोजन मिळतो. उन्हाचे चटके सोसत आलेले प्रवासी काही वेळ येथे बसतात. नास्ता करतात, कोणी भोजन करतात. मात्र, याठिकाणी एक मिनीटही थांबत येत नाही, असे आतील वातावरण आहे. बसताच क्षणी गरम वाफा, उष्णतेचा भडका उडाल्यासारखे वाटते. प्रवासी कसे बसतील? असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे. किमान एसीची व्यवस्था असावी, असे प्रवासी सांगतात. जनआहारमध्ये कुलर, पंखे आहेत. मात्र, कुठलीच यंत्रणा काम करीत नसल्याचे कर्मचार्‍यांनी सांगितले. प्रवाशांच्या हितासाठी तत्पर असलेल्या रेल्वे प्रशासनाने याकडे लक्ष घालावे, अशी मागणी होत आहे.

NewsToday24x7

Next Post

‘शासन आपल्या दारी’ला मिळणार महालाभार्थी पोर्टलची जोड

Mon May 22 , 2023
अभियानाची व्याप्ती वाढवा, सर्वांना सहजपणे लाभ मिळावेत – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुंबई :- ‘शासन आपल्या दारी’ योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी महालाभार्थी पोर्टलचा उपयोग करून घेण्यात येणार असून यामुळे या योजनेची व्याप्ती वाढणार आहे. सह्याद्री अतिथीगृह येथे याबाबत आज एक सादरीकरण करण्यात आले. जास्तीत जास्त नागरिकांना सहज सुलभ लाभ मिळावेत म्हणून या पोर्टलचा देखील उपयोग व्हावा, अशी सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे […]

You May Like

Latest News

The Latest News

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com