चक्रवर्ती सम्राट राजाभोज जयंती साजरी

महादुला :-काल दु, 12 वाजता पासून संपूर्ण दिवसभर चक्रवर्ती सम्राट राजाभोज यांच्या जयंती निमित्ताने श्रीवासनगर महादुला हनुमान मदीर येथे साजरी करण्यात आली परीसरात जयंती,वसंतपंचमी,सरस्वती पुजनने सुरूवात झाली, या कार्यक्रमात, अध्यक्ष छगन राहांगडाले ( विदर्भ चाक्रवती राजा भोज सांस्कृतिक मंडळ) तसेच , प्रमुख अतिथी राजेश रंगारी ,प्रितम लोहासारवा व केशव ठाकरे, फुलीचंद चव्हाण, सुगरता  राहांगडाले, गुणेश राहांगडाले प्रामुख्याने उपस्तित राजाभोज, मानवसेवा समीती चे सर्व पदाधिकारी उपस्थित होते यात अध्यक्ष दिनेश राहांगडाले, केवलचंद कटरे, पिंटू चव्हाण युवा समिती अध्यक्ष, जवाहर लाल राहांगडाले, घनश्याम चव्हाण जितेश भगत, चैनलाल बोपचे मधुकर पारधी, चित्रासेन राहांगडाले,, रामूजी पटले संचालक, गणेश्वर हरिनखेडे, शंभु  गौतम, राजेंद्र पारधी,अजय चौधरी, दिलीप पटले, मनोहर बोपचे, मनोज राहांगडाले, सौरभ राहांगडाले, तुळशीराम बिसेन अक्षय राहांगडाले, सोमेश्वर चौधरी, राहुल राहांगडाले, सेवकराम हरिनखेडे, महेंद्र येडे, शुभम अंबुले, मुनालालजी राहांगडाले, मनोज चव्हाण, सतीश राहांगडाले किशोर शरनगात सुनील गौतम विजय बोपचे ई.

राजाभोज समितीयांनी चक्रवर्ती राजा क्षत्रीयकुलीन होते अतिशय शुरवीर होते मानव कल्याणार्थ कार्य अतिशय मोठे होते त्यामुळे संपूर्ण पोवार समाज, त्यांच्या आदर्शावर मार्गक्रमण करतो आहे ,महादुला मध्ये राजाभोज जयंती, ही वसंत पंचमी, आणी गणेशजयंती च्या दिवशी आल्याने हा दुधसर्करा योग आहे आमची संस्था सर्वधर्मीय जातीच्या गरीब, व्रुद्ध व्यक्तींना आवश्यक सेवा देत राहते, मग कोरोना काळ असु देत की, पूरहानी सगळ्या ठिकाणी संस्थेचे माझ्यासह सर्व समीती बांधव एकजुटीने कार्य करतात याचा आम्हांला अभिमान आहे.

याप्रसंगी छगन रहांगडाले यांनी सुद्धा पोवार समाज, राजाभोज समीती च्या कार्याबद्दल संतोष व्यक्त करीत समाजाची उन्नती हे राजाभोज सम्राट राजाचे खरे वारसदार म्हणून आजपर्यंत उत्कृष्ट कामगिरी करीत आहात याचा सार्थ अभिमान आहे पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.

अध्यक्ष राजेश रंगारी यांनी नगरपंचायत कडून पोवारजातीच्या गुणवंत विद्यार्थी व मुलींना आवश्यक मदत, युवकांनी, मोदी शासन व महाराष्ट्र शासनाच्या सर्व योजनाची माहीतीसमाजाला देवून समाजहिताचे कार्य घडण्यास मदत करावी मी सदैव आपल्या पाठीशी आहे असे प्रतिपादन केले.

कार्यक्रमात महादुला लोणखैरी नांदा, घोगली, कोराडी पांजारा, भोकारा, माँडर्नस्कुल, खापरी, आणी नागपुर मधील बंधुभगणी मोठ्याप्रमाणात उपस्थित होते.कार्यक्रमाची सांगता प्रितीभोजन ने झाली.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता पसरविणा-या ८६ प्रकरणांची नोंद

Thu Feb 15 , 2024
– उपद्रव शोध पथकाची धडक कारवाई नागपूर :- नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने सार्वजनिक ठिकाणी लघुशंका करणाऱ्यांवर, कचरा फेकणाऱ्यांवर, थुकणाऱ्यांवर, ५० मायक्रॉन पेक्षा कमी प्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्यांवर अधिक कठोर कारवाईची सुरुवात केली आहे. बुधवार (ता.१४) रोजी उपद्रव शोध पथकाने ८६ प्रकरणांची नोंद करून १ लाख ०७ हजार १०० रुपयाचा दंड वसूल केला. शहराला स्वच्छ ठेवण्यासाठी रस्त्यावर, फुटपाथवर कचरा टाकणारे, […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com