‘केन्द्रीय संचार ब्यूरो, क्षेत्रीय कार्यालय, नागपूर विद्यार्थ्यांना आणि जनसामान्यांना स्वातंत्र्याच्या इतिहासाची माहिती पोहचवणार 

– सिताबर्डी मेट्रो जंक्शन येथे तीन दिवसीय मल्टिमीडिया फोटो प्रदर्शनाचे आयोजन

नागपूर :- स्वतंत्रता दिवसाच्या अनुशंगाने भारत सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयांतर्गत येणाऱ्या केन्द्रीय संचार ब्युरो, क्षेत्रीय कार्यालय, नागपूर, नागपूर महानगर पालिका आणि महामेट्रो, नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने 13, 14 तथा 15 अगस्त, 2024 रोजी सिताबर्डी मेट्रो जंक्शन, नागपुर येथे तीन दिवसीय मल्टिमीडिया फोटो प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. या वर्षी दिनांक 9 से 15 अगस्त 2024 दरम्यान देशभरात ‘’हर घर तिरंगा’’ अभियान व्यापक स्वरूपात चालविण्यात येत आहे या अभियानच्या प्रचार आणि प्रसार करण्याच्या उद्येश्याने आयोजित, हर घर तिरंगा, स्वतंत्रता दिवस, विभाजन विभीषिका, आजादी का अ‍मृत महोत्‍सव विषयां वर आधारीत या प्रदर्शनाचे उद्घाटन दिनांक 13 ऑगस्ट रोजी सकाळी 10:00 वाजता होणार आहे.

दुर्मिळ छायाचित्रांचे प्रदर्शन

सदर प्रदर्शनात दुर्मिळ छायाचित्रांच्या माध्यमातून दर्शकांना प्रेरणादायी माहिती मिळणार आहे. हे प्रदर्शन सर्व विद्यार्थी आणि नागरिकांसाठी नि:शुल्क उपलब्ध असेल. श्री सौरभ खेकडे, क्षेत्रीय प्रचार अधिकारी, केन्द्रीय संचार ब्युरो, क्षेत्रीय कार्यालय यांनी सर्व विद्यार्थी आणि नागरिकांना या प्रदर्शनाचा मोठ्या संख्येने लाभ घेण्याचे आवाहन केले आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

बेलिशॉप प्राचीन शिव मंदिर में अखंड रामायण व सेज

Tue Aug 13 , 2024
नागपुर :- श्रावण मास निमित्त बेलिशॉप रेलवे कॉलोनी कामठी रोड स्थित प्राचीन श्री शिव मंदिर में रामचरित्र मानस अखंड रामायण पाठ का आयोजन किया गया है। अखंड रामायण पाठ की शुरुवात 14 अगस्त बुधवार दोपहर 11 बजे होगी। इस अवसर पर रामजी की प्रतिमा के विग्रह का अभिषेक किया जायेगा। इस अवसर पर श्रावण मास निमित्त प्राचीन शिव मंदिर के […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com