संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- गेल्या काही वर्षांपासून सातत्याने नव नवीन उपक्रम राबवून विद्यार्थ्यांत शिक्षणाची गोडी निर्माण करणाऱ्या आणि कामठी तालुक्यात आजनी गावाचा नावलौकिक वाढविणाऱ्या जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा आजनीच्या वतीने मंगळवार दिनांक २७ ऑगस्ट २०२४ रोजी भगवान श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त दहीहंडीचा कार्यक्रम आयोजित केला होता.
या सोहळ्यात विद्यार्थ्यांची श्रीकृष्ण, राधा वेशभूषा स्पर्धा घेण्यात आली. वर्ग केजी १ ते सातव्या वर्गापर्यंत सर्व विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेऊन या सोहळ्याचा आनंद घेतला. हा दहीहंडी कार्यक्रम राबविण्यासाठी जिल्हा परिषद शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा ललिता ठाकरे तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका आंडे,आणि त्यांचे सहकारी सावरकर बुंदले, मेश्राम, धकाते, आदींनी विशेष परिश्रम घेतले तर या सोहळ्याला आजनी गावातील सरपंच, उपसरपंच आणि ग्रामपंचायत सदस्य गण यांच्यासह काही प्रतिष्ठित नागरिक व पालक वर्ग उपस्थित होते.
विविध उपक्रमांद्वारे सामान्य गरीब विद्यार्थ्यांना शाळेकडे निव्वळ आकर्षितच नव्हे तर उत्तम शिक्षण देण्याच्या शाळा व्यवस्थापन समितीच्या कार्याचे कवी लीलाधर दवंडे, पंचायत समिती सदस्य उमेश भाऊ रडके, गावातील सर्व क्रीडा तसेच सामाजिक मंडळांनी कौतुक केले आहे.