– विद्यार्थी डासांमुळे त्रस्त
कोदामेंढी :- येथे गुरुवार दिनांक 28 सप्टेंबरला सायंकाळ सुमारास मुसळधार पाऊस झाला. या पावसामुळे गावातील चारही वार्डातील खोलगट भागात पाणी साचलेला होता. गावातील चारही वार्डातील खोलगट भागातील पाणी शुक्रवार व शनिवार पर्यंत गावातील साध्या नाल्या व भूमिगत नाल्यांच्या मार्गाने निघून गेला होता, परंतु जिल्हा परिषद हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्रांगणातील पाणी आज शनिवार दिनांक 28 सप्टेंबरला जसेच्या तसेच असल्यामुळे, याबाबत शाळेच्या शेजारी राहणारे श्रावण वाघमारे यांना विचारपूस केली असता, त्यांनी सांगितले की शाळेतील पाणी काढण्यासाठी कोणताच मार्ग नसून नेहमीप्रमाणे सूर्यदेव निघाल्यावर येथील पाणी कमी होणार. मागील महिन्यांपासून शाळेत साचलेल्या पाण्यामुळे डासांची संख्या वाढल्याने विद्यार्थी त्रस्त असून गेंड्याची कातडी घातलेला संबंधित शिक्षण विभाग, गाव स्तरापासून तर जिल्हास्तरापर्यंतच्या शालेय व्यवस्थापन समित्या कुंभकर्णी झोपेत आहे.