पारशिवनी :- पारशिवनी नगरपंचायत अंतर्गत शहरातील प्रभागांमध्ये सार्वजनिक व घरगुती गणेश उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. गणेश उत्सवात पर्यावरण पुरक गणपतीची स्थापना करुन लोकहितवादी देखावे तयार करून घेणारे मंडळ व घरगुती गणेश उत्सव साजरा करा व बक्षिसाचे मानकरी व्हा असे मुख्याधिकारी अर्चना वंजारी यांनी झालेल्या बैठकीत सांगितले. आज पारशिवनी नगरपंचायत सभागृहात आयोजित बैठकीत उपस्थीत पत्रकार, जेष्ठ नागरिक, नगरसेविका, नगरसेवक,आशा वर्कर व अंगणवाडी सेविका मदतनिस यांना गणेश उत्सव व आधार कार्ड मतदान याद्यांमध्ये संलग्न करण्यात यावे याकरिता सर्वाचे सहकार्य मिळाले पाहिजे असे. नगरपंचायत मुख्याधिकारी अर्चना वंजारी यांनी मार्गदर्शन करताना सांगितले.
तर नगरपंचायत तर्फे सार्वजनिक व घरगुती गणेश उत्सव साजरा करताना पर्यावरण पुरक गणेश मुर्तीची स्थापना करण्यात यावी. व देखावा तयार करताना पर्यावरण पुरक व लोकहितवादी असावा व गणेश विसर्जन नगरपंचायत ने तयार करण्यात आलेल्या कृत्रिम तलावात करून व नियमानुसार गणेश उत्सव साजरा केला तर अशा सार्वजनिक व घरगुती गणेश मुर्ती स्थापना केलेल्या कुटुंबाला नगरपंचायत तर्फे प्रथम, द्वितीय व तृतीय रोख बक्षीस व मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. यावेळी नगराध्यक्षा प्रतिभा कुंभलकर, उपाध्यक्षा माधुरी श्याम भिमटे, ठानेदार राहूल सोनवणे, गटनेते सागर सायरे,व नगरसेवक दिपक सिवरकर,जेष्ठ नागरिक परसराम रााऊत, व्यावसायिक राहूल कोचर, प्रत्रकार गोपाल कडू व सेवानिवृत्त शिक्षक उपस्थित होते. ठानेदार राहूल सोनवणे यांनी गणेश उत्सवात कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलीसांना सहकार्य करावे असे सांगितले. कार्यक्रमाचे संचालन महेश भनारकर यांनी केले.