संदीप कांबळे, कामठी
वंचित बहुजन आघाडी कन्हान शहर द्वारे कार्यक्रमाचे आयोजन
कन्हान : – वंचित बहुजन आघाडी कन्हान शहर द्वारे १० मे स्वाभिमानी दिवसा निमित्य कार्यक्रमाचे आयो जन गहुहिवरा चौक कन्हान येथे करून स्वाभिमान दिवस थाटात साजरा करण्यात आला.
मंगळवार (दि.१०) मे ला गहुहिवरा रोड चौक कन्हान येथे वंचित बहुजन आघाडी कन्हान शहर द्वारे आयोजित कार्यक्रमास प्रामुख्याने उपस्थित मनीष नंदेश्वर यांच्या हस्ते डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली. कार्यक्रमात उपस्थित सर्व वंचित बहुजन आघाडी च्या पदाधिका-यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पित करून विनम्र अभिवादन करीत स्वाभिमानी दिवस थाटात साजरा करण्यात आला. याप्रसंगी वंचित बहुजन आघाडी नाग पूर जिल्हा ग्रामिण उपाध्यक्ष राजेंद्र फुलझेले, कन्हान शहर अध्यक्ष नितेश मेश्राम, कन्हान शहर प्रवक्ता रजनिश मेश्राम, भारत फरकाडे, बबलु मुलुंडे, नितीन पांनतावने, लीलाबाई रंगारी, शशांक शेंडे, कैलास सहारे सह पदाधिकारी व नागरिक बहु संख्येने उपस्थित होते.