एम डी तस्कर प्रकरणात हरदास नगर चा आरोपी अटकेत..

संदीप कांबळे,विशेष प्रतिनिधी 

कामठी ता प्र 16 :- स्थानिक नवीन कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या येरखेडा बाह्य वळण मार्ग मोठा पुला जवळ एक इसम संशयीतरीत्या दिसला असता पोलिसांनी त्याला थांबवून त्याची अंगझडती घेतली असता त्याच्या ताब्यातील अवैधरित्या बाळगत असलेले 3.80 ग्राम मेफेड्रोन ड्रग्स पांढऱ्या रंगाचे सदृश्य पावडर जप्त करण्यात आल्याची कारवाही नुकतेच करण्यात आले असून या कारवाहितुन 38 हजार रुपये किमतीचे 3.80 ग्राम एम डी ,एक महागडा मोबाईल किमती 7 हजार रुपये असा एकूण 45 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करून आरोपी क्षितिज आतिष रहाटे वय 18 वर्षे रा हरदास नगर कामठी विरुद्ध गुन्हा नोंदवून अटक करण्यात आले.

कामठी शहरात एम डी सारख्या अंमली पदार्थाचा मोठ्या प्रमाणात शिरकाव झाला असून या एम डी च्या विळख्यात तरुणाई अडकली आहे.नुकतेच जुनी कामठी पोलिसांनी ‘एम डी’प्रकरणातील एका मोठ्या टोळीचा पर्दाफाश करण्यात पोलिसांना यशप्राप्त झाले असले तरी या प्रकरणात या व्यवसायाशी संबंधित 150 च्या जवळपास लोकांना आरोपी बनवण्यात येणार आहे.

Email Us for News or Artical - [email protected]
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com