चंद्रपूर :- मनपातर्फे राष्ट्रीय स्वच्छ हवा दिवस कार्यक्रम, केंद्र शासनाच्या एक पेड माँ के नाम वृक्षारोपण मोहिमेअंतर्गत स्मृतिवन बनवून साजरा करण्यात आला. महानगरपालिकेच्या कंपोस्ट डेपो समोरील नाना नानी उद्यान येथे सदर कार्यक्रम शनिवार ७ सप्टेंबर रोजी सकाळी ८ वाजता घेण्यात आला. यात आयुक्त विपीन पालीवाल यांच्या हस्ते वृक्ष लावून स्मृतिवन बनविण्यास सुरवात करण्यात आली.
याप्रसंगी आयुक्त यांनी वृक्षाचे महत्व सांगतांना ज्याप्रमाणे आपण आपल्या आईची काळजी घेतो त्याचप्रमाणे या वृक्षाची काळजी घेणे आवश्यक असल्याचे सांगितले.मनपातर्फे विविध उपक्रमांद्वारे शहरात मोठ्या प्रमाणात वृक्ष लागतील याची काळजी घेण्यात येते. वृक्षलागवड मोहिमेत विद्यार्थी व त्यांच्या शाळा यांचा समावेश विविध स्पर्धांद्वारे घेण्यात आला आहे. ज्येष्ठ नागरिक ,महाविद्यालयीन विद्यार्थी, महिला यांच्यासाठी सुद्धा विविध स्पर्धा घेऊन त्यांच्याद्वारे वृक्षांची लागवड व संगोपन होईल यांची निश्चिती मनपाने केली आहे.एक पेड माँ के नाम ही मोहीम देखील सर्वांच्या सहकार्याने यशस्वी होईल असा विश्वास व्यक्त केला.
याप्रसंगी उपस्थीत सर्वांच्या आईच्या नावे वृक्ष लावण्यात आले तसेच सर्वांनी लावलेल्या या छोट्या झाडाचे मोठा वृक्ष होईपर्यंत संगोपन करण्याचे तसेच झाडाची आपल्या आईप्रमाणे काळजी घेण्याची शपथ घेतली.
कार्यक्रमास आयुक्त विपीन पालीवाल, उपायुक्त मंगेश खवले, शहर अभियंता विजय बोरीकर,सहायक आयुक्त अक्षय गडलिंग,शुभांगी सुर्यवंशी,उपअभियंता रवींद्र हजारे, रवींद्र कळंबे, मनपाचे वृक्ष मोहिमेचे ब्रँड अँबेसेडर उषा बुक्कावार, गोपाल मुंधडा,स्नेहल पोटदुखेडॉ.अमोल शेळके शेळके,नागेश नित, चैतन्य चोरे,नरेंद्र पवार,अतुल भसारकर,जितेश मुसनवार उपस्थीत होते.