पर्यावरणपूरक धुळवड साजरी करा : मनपा आयुक्तांचे आवाहन

नागपूर : मंगळवारी 7 मार्च रोजी साजरी होणारी धुळवड पर्यावरण पूरकरित्या साजरी करा, असे आवाहन मनपा आयुक्त तथा प्रशासक राधाकृष्णन बी. यांनी नागपूरकरांना केले आहे.

मंगळवारी धुलीवंदन साजरे करताना पाण्याचा वापर टाळावा तसेच रासायनिक रंगांचाही वापर करू नये. त्याऐवजी पर्यावरणपूरक हर्बल रंगांचा वापर करावा. होळी हा आनंदाचा सण आहे. रासायनिक रंगांचा वापर करून कुणाला इजा पोहोचवून या उत्सवाला गालबोट लावू नये. पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने आपली ही कृती अत्यंत महत्वाची ठरणार असून नागपूरकर जनतेने याबाबत पुढाकार घेण्याचे आवाहन आयुक्तांनी केले आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

Arunpal Singh Behal felicitated 

Mon Mar 6 , 2023
Nagpur – SFS School Old Boys Association Secretary and Keraleeya Samajam,Treasure Lijo Jose and SFS OBA Treasurer Santosh George felicitated their President Arunpal Singh Behal for recently getting appointed as Convenor Nagpur Shiv Sena. Doctor Gopal Arora President of Maharashtra Ophthalmologic Association, Gurmeet Singh Vij Chairman of Nova Travels , Ashok Sayare Member of Green Earth Organization and Fourtune Foundation […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com