नागपूर :- सीबीएसई बारावीच्या परीक्षेत हिवरी लेआउट येथील रहिवाशी भूमी धर्मपाल मेश्राम हिने ८६ टक्के गुणांसह यश संपादित केले आहे. भूमी ही भवन्स श्रीकृष्णनगर येथील विद्यार्थिनी आहे. अभ्यासातील सातत्य आणि नियमित सराव यामधून हे यश मिळविल्याचे भूमीने सांगितले आहे. तिने यशाचे श्रेय शाळेचे मुख्याध्यापक, वर्गशिक्षक, वडील ॲड. धर्मपाल मेश्राम व आई अर्चना मेश्राम यांना दिले.