संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कामठी :- स्थानिक नवीन कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या नया गोदाम रहिवासी व मागील दहा वर्षांपूर्वी बँक ऑफ महाराष्ट्र मधून सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्याचा राहत्या घरातच आकस्मिक मृत्यू झाल्याची घटना दुपारी 3 दरम्यान घडली असून मृतकाचे नाव हरिदास चांदेकर वय 70 वर्षे रा कामठी असे आहे.मृत्यूचे कारण कीटकनाशक औषध प्राशन केल्याचे सांगण्यात येते. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी […]

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  वेकोली गोंडेगाव खदान मैदानावर क्रिकेट स्पर्धेत २० राज्यातील संघ सहभागी.  कन्हान : – वेकोली गोंडेगाव खुली खदान मैदानावर सनसुई क्रिकेट क्लब गोंडेगाव यांच्या वतीने तीन दिवसीय टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेत छत्तीसगड च्या कुम्हाली संघाने अंतिम सामना जिंकत स्व.संजय नायडु ट्रॉफी विजेता ठरला . स्व.संजय नायडु यांच्या स्मरणार्थ आयोजित स्पर्धेत विविध राज्यातील वीस संघांनी सहभाग घेतला होता. […]

कामठी ता प्र 13 :- मध्य प्रदेशातून नागपूर कडे जनावराची तस्करी करणाऱ्या वाहनाचा नवीन कामठी पोलिसांनी सिनेस्टाईल पाठलाग करून 15 जनावरांना जीवदान देऊन दोन आरोपींना अटक करून आठ लाख 75 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केल्याची कारवाई मंगळवारला पहाटे 5 वाजता सुमारास केली नवीन कामठी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी इरफान अहमद फिरोज अहमद वय 23 राहणार वनदेवी नगर यशोधरा नागपूर, शेख […]

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कामठी :- स्थानिक जुनी कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या गांधी स्कुल जवळ वाहन क्र एम एच 31 डी एस 3937 ने गोवंश जनावरे अवैधरित्या कत्तलीसाठी वाहून नेत असता पोलिसांनी वेळीच धाड घालून सदर वाहन ताब्यात घेत वाहनातील 7 गोवंश जनावरे नजीकच्या गोरक्षण शाळेत सुरक्षित हलवून कत्तलीसाठी जाणाऱ्या गोवंश जनावरांना जीवनदान दिल्याची यशस्वी कारवाही गतरात्री 11.45वाजता केली […]

“तुच आहेस तुझ्या जिवनाचा शिल्पकार” वर व्याख्यान नागपूर :-  सध्याच्या धकाधकीच्या आयुष्यात ताणतणाव प्रचंड प्रमाणात वाढला आहे, कोरोना नंतर तर तणावाचे प्रमाण १५ टक्क्यांनी अधिक झाले आहे. अशात ताणतणाव विरहित आयुष्य जगण्यासाठी सकारात्मक विचार आणि सकारात्मक वृत्ती मनात ठेवेने अत्यंत महत्वाचे आहे. सकारात्मक विचार आणि वृत्ती ही आनंदी आयुष्याची खऱ्या अर्थाने गुरुकिल्ली असल्याचे प्रतिपादन विख्यात नेत्रतज्ज्ञ डॉ. दिलीप पटवर्धन यांनी […]

जिल्हयात आपत्ती व्यवस्थापनासाठी 300 आपदा-मित्रांची जोड, प्रशिक्षणास सुरूवात गडचिरोली :- प्रशासन तसेच सर्वसामान्य नागरिक मोठ्या प्रमाणात आपत्तीच्या स्थितीत मदत करतात. कोणताही प्रकारचा स्वहेतू किंवा प्रसिद्धी दूर ठेवून पूरस्थितीत लोकांचे जीव वाचविले जातात. त्याचप्रकारे तुम्ही आपदा-मित्र म्हणून काम करताना स्वहेतू मनात न ठेवता काम करावे. यातूनच खऱ्या अर्थाने सेवा होत असते असे प्रतिपादन जिल्हाधिकारी संजय मीणा यांनी आपदा मित्र प्रशिक्षण कार्यक्रमाच्या […]

मुंबई – जलयुक्त शिवार अभियान २.० सुरु करण्याचा निर्णय. राज्यातील गावे पुन्हा जलसमृद्ध होणार. (मृद व जलसंधारण विभाग) जळगांव जिल्ह्यातील कुऱ्हा-वढोदा इस्लामपूर उपसा सिंचन योजनेला गती देणार. २२२६ कोटी सुधारित खर्चास मान्यता. (जलसंपदा विभाग)  आदिवासी शासकीय आश्रमशाळेतील १५८५ रोजंदारी कर्मचाऱ्यांना नियमित करणार (आदिवासी विभाग) खेड्यांच्या सर्वांगीण विकासासाठी मनरेगा आणि इतर विविध विभागांची सांगड. राज्यातील ग्रामीण भागात सुविधा संपन्न कुटुंब मिशन […]

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी   – १०४ नागरिकांना मोफत चष्मे वाटप सह १८६ नागरिकांनी शिबीराचा घेतला लाभ.  कन्हान :- बळीरामजी दखने हायस्कुल कन्हान येथे रामकृष्ण मठ नागपुर व महात्मे नेत्र रुग्णालय नागपुर यांच्या संयुक्त विद्यमाने नि:शुल्क मोतीबिंदु शस्त्रक्रिया शिबीराचे आयोजन करून १०४ नागरिकांना मोफत चष्मे वाटप सह १८६ नागरिकांनी शिबीराचा घेतला लाभ. नि:शुल्क मोतीबिंदु शस्त्रक्रिया शिबीर कार्यक्रमाच्या अध्यक्षा मुख्याध्यापिका विशाखा ठमके, […]

नागपूर :-बहुजन समाज पार्टी महाराष्ट्र प्रदेशच्या वतीने प्रदेशाध्यक्ष ऍड. संदीप ताजने यांच्या नेतृत्वात महाराष्ट्र राज्य विधिमंडळावर 23 मार्च रोजी एका आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आलेले आहे. हा आक्रोश मोर्चा इंदोरा येथून सकाळी 11 वाजता निघेल. या मोर्चात महाराष्ट्र प्रदेशचे प्रभारी ऍड सुनील डोंगरे, प्रशांत इंगळे, हुलगेश चलवादी, मनीष कावळे तसेच महाराष्ट्रातील सर्व प्रदेश महासचिव, प्रदेश सचिव, जिल्हाध्यक्ष, विधानसभा अध्यक्ष आपल्या […]

संदीप कांबळे,विशेष प्रतिनिधी  कामठी ता 13 :-  निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या निवडणूक कार्यक्रमानुसार येत्या 18 डिसेंबर 2022 ला होऊ घातलेल्या कामठी तालुक्यातील 27 ग्रा प ची थेट जनतेतून सरपंच व सदस्यपदाची निवडणूक पारदर्शक वातावरणात पार पडावे तसेच आदर्श आचारसंहितेचे पालन व्हावे यासाठी प्रशासनाने कंबर कसली असून कामठी तालुक्यातील 122 मतदान केंद्राबाबत माहिती देणे,ईव्हीएम मशीन ची माहिती देणे तसेच आचारसंहितेच्या नियमांची […]

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कामठी ता प्र 13 :- स्थानिक नवीन कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या कामठी कळमना मार्गावरील लाईफ लाईन हॉस्पिटल जवळ कामठी कडे सरळ मार्गाने जाणाऱ्या ट्रक दुचाकी अपघातात दुचाकीस्वार तरुणाचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना आज सायंकाळी 5 दरम्यान घडली असून मृतक तरुणाचे नाव विकास गोविंद पवार वय 21वर्षे रा बँक ऑफ इंडिया जवळ,202,वैभवी अपार्टमेंट ,हूडकेश्वर रोड, […]

नागपूर : गेल्या ९ वर्षांपासून चर्चेत असलेल्या नागनदी प्रदूषण निर्मुलनाच्या प्रकल्पाला अखेर केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. सुधारित १९२७ कोटींच्या प्रकल्पाला मंजुरी देत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागपूर दौऱ्यापूर्वी नागपूरकरांना भेट दिली. पुढील सहा महिन्यांत प्रकल्प व्यवस्थापन व टेंडर प्रक्रियेवर काम करण्यात येणार आहे. नागनदी प्रदूषण निर्मूलन शहराचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून साकार हा […]

नागपूर :- सुरक्षा ठेव घोटाळ्यात गुन्हा दाखल असलेल्या नानक कन्स्ट्रक्शन कंपनीचे बिल जिल्हा परिषदेच्या पाणी पुरवठा विभागाने मंजूर केले. त्यामुळे पोलिसांप्रमाणे ठेकेदारांचेही हात ‘लंबे‘ होते याचा प्रत्यय आला. जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीला हे पटले नसल्याने बैठकीत चांगलाच गदारोळ उडाला. जिल्हा परिषदेत सुरक्षा ठेव घोटाळा समोर आल्यानंतर नानक कंस्ट्रक्शनसह दहा कंत्राटदारांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. नानक कंस्ट्रक्शनला काळ्या यादीत टाकण्याचा […]

– ‘मजीप्रा’च्या कामांचा दर्जा रसातळाला नागपूर : नागपूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागामध्ये महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या (MJP) माध्यमातून सुरू करण्यात येत असलेल्या कामांचा दर्जा अतिशय निकृष्ट असल्याने ठेकेदार जिल्हा परिषदेच्या (ZP) रडावर आले आहेत. जलव्यवस्थापन समितीच्या बैठकीत याबाबत ठेकेदार आणि अधिकारी यांना चांगलेच धारेवर धरण्यात आले. पदाधिकाऱ्यांसह सदस्यांनी एमजेपीच्या कामावर तीव्र नाराजी व्यक्त करून यापुढे अशा प्रकारची कामे व तक्रारी खपवून घेतल्या […]

नागपूर (Nagpur) : समृद्धी महामार्गामुळे (Samruddhi Mahamarg) शेतकऱ्यांचा मोठा फायदा होणार आहे. कोणताही पायाभूत सुविधांचा प्रकल्प साकारताना त्याला ह्युमन टच देणे आवश्यक असते. डबल इंजिन सरकारमुळे विकासाला गती मिळाली आहे. समृद्धी महामार्गामुळे महाराष्ट्राच्या विकासाला गती मिळेल, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी केले. हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाच्या पहिल्या टप्प्याचे उद्धाटन रविवारी मोदींच्या हस्ते झाले. या प्रसंगी ते […]

नागपूर:-बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीच्या वतीने संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष एडवोकेट डॉ.सुरेश माने यांच्या अध्यक्षतेत पत्रकार परिषद झाली. यापरिषदेला रमेश पाटील, Dr.विनोद रंगारी, एस.बी. रामटेके, विश्राती झामरे, मोरध्वज अढाऊ, अशोक चौरपगार, एस.टी.पजारे आणि प्रवीण खापर्डे यावेळी उपस्थित होते.  

संदीप बलविर ,प्रतिनिधी नागपूर :- बुट्टीबोरी औधोगिक क्षेत्रामधील विदर्भ इंडस्ट्रीज प्रायवेट लिमी कंपनी मध्ये सोमवार दि १२ डिसें ला सायं ६:३० वाजताच्या जवळपास ६ फुटाचा अजगर आढळुन आला. साप हा प्राणी अनेक ठिकाणी पाहायला मिळतो. एकीकडे सापाला शेतकर्‍याचा मित्र समजला जातो तर दुसरीकडे ६ फूट लांबीचा अजगर साप समोर दिसताच माणसाच्या हृदयाचे ठोके बंद पडतात.अशा परिस्थितीत विदर्भ इंडस्ट्रीज कंपनीत सायंकाळी […]

संदीप बलविर,प्रतिनिधी – हनुमान नगर वासीयांचे नगरपरिषदेसमोर धरणे आंदोलन – आदीवासी अधिकार राष्ट्रीय मंच कडून नागरपरिषदेकडे विविध मागण्या करिता निवेदन नागपूर :- बुटीबोरी येथील हनुमान नगर वासियांना ते राहत असलेल्या घराचे मालकी पट्टे देण्यात यावे, हनुमान नगर वसाहतीत नागरी सुविधा प्रदान करण्यात याव्या, बुटीबोरीतून हनुमान नगरकडे येण्याच्या रेल्वे मार्गावर फाटक लावण्यात यावे आदी मागण्यांना घेऊन आदिवासी अधिकार राष्ट्रीय मंचाच्या वतीने […]

मनपा आयुक्तांचे आदेश : १० मार्च २०२३ पर्यंत दोन्ही बाजूची वाहतूक बंद नागपूर :- सिमेंट रोड बांधकामाकरिता वर्धा रोड हॉटेल रेडिसन ब्ल्यू ते जयताळा रोड, यशोदा पब्लिक स्कूल ते जयताळा बाजार चौकापर्यंत वाहतूक प्रतिबंधित करण्याचे आदेश महानगरपालिका आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी दिले आहेत. त्या अनुषंगाने १० मार्च २०२३ पर्यंत उपरोक्त मार्गावरून कोणत्याही वाहतुकीस दोन्ही बाजुकडील मार्ग बंद करण्यात येणार आहे. […]

नागपूर :-  स्वच्छ भारत अभियान अंतर्गत नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने सोमवारी (ता.12) 4 प्रतिष्ठानांवर कारवाई करून 30 हजार रुपयांचा दंड वसूल केला. मनपा आयुक्त तथा प्रशासक राधाकृष्णन बी. यांच्या मार्गदर्शनात धंतोली ‍ आणि आशीनगर झोनच्या उपद्रव शोध पथकाद्वारे प्रतिबंधित प्लास्टिक पिशवी संदर्भात 3 प्रतिष्ठानांवर कारवाई करून 25,000/- रुपयांचा दंड वसूल करण्यात आला तसेच 19 किलो प्लास्टिक जप्त करण्यात आले.उपद्रव […]

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com