– उपमुख्यमंत्र्यांची दिक्षाभूमीला भेट व महामानवाला अभिवादन नागपूर :- भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मृतींना वंदन करुन प्रेरणा व नवी उर्जा मिळते. दिक्षाभूमीला आल्यानंतर नेहमीच वेगळी अनुभूती व समाधानही मिळते, अशा भावना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे व्यक्त केल्या. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे दिक्षाभूमी स्मारक समितीच्या वतीने स्वागत करण्यात आले. यानंतर शिंदे यांनी बुद्ध प्रतिमा व बाबासाहेबांच्या अस्थिचे दर्शन घेवून अभिवादन […]
Marathi News
मुंबई :- राज्यातील रोजगार हमी योजनेतील मजुरांच्या बँक खात्यामध्ये सन 2024- 25 मध्ये 2 हजार 856.30 कोटी रुपयांचा निधी जमा करण्यात आल्याची माहिती रोजगार हमी योजना विभागाकडून देण्यात आली आहे. या योजनेंतर्गत 100 दिवसांपर्यंतची मजुरी केंद्र शासनाकडून प्राप्त होणाऱ्या निधीमधून दिली जाते. तर 100 दिवसांच्या वरील मजुरी राज्या शासनाच्या निधीतून दिली जाते. त्यानुसार सन 2024-25 मध्ये 100 दिवसांपर्यंत मजुरीचे 2 […]
मुंबई :- कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाद्वारे राष्ट्रीय मधुमक्षिका मंडळ, नवी दिल्ली अंतर्गत विकसित केलेल्या Madhukranti.In/nbb या मधुक्रांती पोर्टलला या वेबसाईटवर मधुमक्षिका पालकांनी नोंदणी करण्याचे आवाहन महाराष्ट्र राज्य फलोत्पादन आणि औषधी वनस्पती मंडळाचे संचालक किसन मुळे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे. मध आणि मधमाशी संबंधित अन्य उत्पादनांच्या योग्य स्त्रोताचा शोध घेण्याच्या दृष्टीने व अद्यायावत नोंदी ठेवण्यासाठी मधुक्रांती पोर्टल विकसित करण्यात […]
मुंबई :- भारतीय सैन्यदल, नौदल व वायुदलामध्ये अधिकारी पदावर भरती होण्यासाठी पात्र उमेदवारांना कम्बाईंड डिफेन्स सर्विसेस (CDS) या परीक्षेच्या पूर्व तयारीसाठी छात्रपूर्व प्रशिक्षण दिले जाते. नाशिक येथे महाराष्ट्र शासनातर्फे महाराष्ट्रातील युवक व युवतीसाठी २० जानेवारी २०२५ ते ४ एप्रिल २०२५ या कालावधीत सी.डी.एस.(CDS) प्रशिक्षणाचे क्र. ६४ आयोजन करण्यात येणार आहे. या प्रशिक्षणात निशुल्क प्रशिक्षणासह, निवास व भोजन उपलब्ध असेल अशी […]
नागपूर :- मुंबई शहराजवळ अरबी समुद्रातील बुचर आयलँडनजिक नीलकमल कंपनीच्या एका प्रवासी बोटीला नौदलाच्या बोटीने धडक दिल्याची घटना १८ डिसेंबर २०२४ रोजी दुपारी ३.५५ च्या सुमारास घडली. या बोटीतील एकूण ११० प्रवाशांपैकी ९६ प्रवाशांना सुरक्षित वाचविण्यात आले असून अद्याप शोधकार्य सुरू असल्याची माहिती मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज विधानपरिषदेत निवेदनाद्वारे दिली. मुंबईतील बोट दुर्घटनेप्रकरणी विधानपरिषदेत मंत्री चंद्रकांत पाटील यांनी निवेदन […]
नागपूर :- ताम्हिणी घाटातील बस दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबियांना पाच लाख रुपयांची आर्थिक मदत देण्यात येईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी विधानसभेत सांगितले. पुणे येथून महाडकडे जाणाऱ्या बसला ताम्हिणी घाटात अपघात झाला. ही दुर्घटना अत्यंत दुर्दैवी असल्याचेही मुख्यमंत्री म्हणाले.
नागपूर :- नगरविकास व सार्वजनिक आरोग्य विभागाच्या २०२४-२०२५ या वर्षासाठीच्या ३ हजार ४६२ कोटी १७ लाख रुपयांच्या पुरवणी मागण्यांना विधानसभेत मंजुरी देण्यात आली. त्यामध्ये नगर विकास विभागाच्या २ हजार ७७४ कोटी ४३ लाख आणि सार्वजनिक आरोग्य विभागाच्या ६८७ कोटी ७४ लाख रुपयांच्या पुरवणी मागण्या मंजूर करण्यात आल्या. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुरवणी मागण्यांवरील चर्चेला उत्तर देतांना सांगितले की, पुरवणी मागण्यांवरील […]
नागपूर :- सिव्हील लाईन्स परिसरातील मुख्यमंत्री सचिवालयात साकारलेली ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने’वर आधारीत महारांगोळी विधीमंडळ अधिवेशनानंतरही सर्व सामान्यांना पाहण्यासाठी खुली ठेवण्यात येणार असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता संजय उपाध्ये यांनी दिली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्यावतीने मुख्यमंत्री सचिवालय परिसरात विधीमंडळ हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाच्या विविध विभागांची शिबिर कार्यालये उभारण्यात आली आहेत. राज्य शासनाच्या महत्वाकांक्षी मुख्यमंत्री माझी लाडकी […]
– अटल भू-जल अभियान – भूजल सर्वेक्षण आयुक्त तथा संचालकां कडून पाहणी – ग्राम पंचायत खुर्सापार येथील प्रकल्पाची पाहणी कोंढाळी :- भूजलाच्या अनियंत्रीत उपशामुळे होत असलेली भूजल पातळीतील घसरण थांबविणेकरीता केंद्र शासन व जागतिक बँक यांचे संयुक्त विद्यमाने भारतातील महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, हरियाना, कर्नाटक, गुजरात आणि राजस्थान या सात राज्यात १०० टक्के केंद्र पुरस्कृत अटल भूजल योजना राबविण्याचा […]
नागपूर :- राज्याचे कॅबीनेट मंत्री जयकुमार रावल यांनी आज दीक्षाभूमी येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकास भेट देऊन अभिवादन केले. यावेळी डॉ. राजेंद्र गवई, विलास गजघाटे, नारायण पाटील, बबन चौधरी, डी. एस. गिरासे, बंटी नगराळे आदी उपस्थित होते. रावल यांनी भगवान गौतम बुध्दाच्या मुर्तीला अभिवादन केले.
– उच्चाधिकार समितीस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रमुख उपस्थिती नागपूर :- विधिमंडळ अधिवेशनासह मंत्रालयातील विविध कामांसाठी मुंबईत येणाऱ्या आमदारांसाठी निवासाची व्यवस्था होण्याकरिता उभारण्यात येत असलेल्या मनोरा आमदार निवास इमारतीच्या बांधकामाला गती देऊन ते जानेवारी 2027 पर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी उच्चाधिकार समितीच्या बैठकीत दिले. मुंबई येथील मनोरा आमदार निवास प्रस्तावित पुनर्विकास प्रकल्पाचा आढावा विधानसभा अध्यक्ष राहुल […]
मुंबई :- माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ या कार्यक्रमात ‘राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त’ राज्य ग्राहक तक्रार निवारण आयोगाचे अध्यक्ष, न्या. सुरेंद्र तावडे तसेच मुंबई ग्राहक पंचायतीचे कार्याध्यक्ष शिरीष देशपांडे यांची विशेष मुलाखत प्रसारित होणार आहे. ही मुलाखत आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून तसेच ‘न्यूज ऑन एआयआर’ या ॲपवरून सोमवार दि. 23, मंगळवार दि. 24, बुधवार दि. 25 आणि गुरुवार दि.26 डिसेंबर 2024 […]
– पॅरा-बॅडमिंटन विश्व चॅम्पियन खेळाडू मानसी जोशी यांची प्रमुख उपस्थिती नागपूर :- केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पेतून नागपूर शहरात लवकरच सातव्या खासदार क्रीडा महोत्सवाचे आयोजन होणार आहे. या अनुषंगाने शनिवारी २१ डिसेंबर २०२४ रोजी खासदार क्रीडा महोत्सवाच्या कार्यालयाचे उद्घाटन पॅरा बॅडमिंटन विश्व चॅम्पियन मानसी जोशी यांच्या हस्ते होणार आहे. शनिवारी (ता.२१) सायंकाळी ५.३० वाजता सीताबर्डी येथील ग्लोकल स्क्वेअर मॉलमधील […]
Ø विधीमंडळ अधिवेशनाच्या 5व्या दिवशीही उत्सफुर्त प्रतिसाद नागपूर :- माहिती व जनसंपर्क महासंचालनालय नागपूर-अमरावती विभाग संचालक कार्यालयाच्या वतीने विधानभवन परिसरात लावण्यात आलेल्या लोकराज्य दुर्मिळ अंकाच्या प्रदर्शनास अधिवेशनात येणाऱ्या लोकप्रतिनिधी, प्रशासकीय अधिकारी, माध्यम प्रतिनिधी व सर्वसामान्यांचा उत्सफुर्त प्रतिसाद मिळत आहे. अधिवेशनाच्या पाचव्या दिवासापर्यंत सुमारे तीन हजार पेक्षा अधिक अभ्यागतांनी या प्रदर्शनास भेट दिली आहे. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी 16 डिसेंबर रोजी माहिती […]
नवी दिल्ली :- ओडिशा राज्याच्या भुवनेश्वर येथील कादंबिनी साहित्य अकादमीच्या वतीने देण्यात येणारा प्रतिष्ठित ‘निलिमाराणी साहित्य सन्मान 2025’ जाहीर झाला असून, महाराष्ट्र कॅडरचे भारतीय परराष्ट्र सेवेतील निवृत्त वरिष्ठ अधिकारी, लेखक, आणि साहित्यिक डॉ. ज्ञानेश्वर मुळे यांना यांना आज जाहीर झाला. दिल्लीतील इंडिया इंटरनॅशनल सेंटर येथे साहित्य अकादमी तर्फे आयोजित कार्यक्रमात या पुरस्काराची घोषणा करण्यात आली. कादंबिनी साहित्य अकादमीच्या वतीने देण्यात […]
– अंबाझरी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल
मुंबई :- कल्याणच्या योगीधाम सोसायटीत मराठी माणसाला झालेली मारहाण आणि अन्यायाच्या घटनेची गंभीर दखल घेण्यात आली असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत सांगितले. महाराष्ट्र हा ‘शिव-शाहू-फुले आंबेडकरां’चा आहे. इथे कुणी मराठी माणसावर अन्याय करत असेल तर ते चालणार नाही. सभागृहात मांडण्यात आलेली माहिती तपासून मराठी माणसावर अन्याय करणारा संबंधित अधिकारी कितीही मोठा असला, तरी त्याची गय केली जाणार नाही. त्याच्यावर […]
नागपूर :- कल्याण येथील सोसायटीमध्ये मराठी माणसांवर झालेल्या हल्ल्या प्रकरणाची राज्य शासनाने गंभीर दखल घेतली आहे. दोषींवर गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील कार्यवाही सुरू आहे. मुंबई ही मराठी माणसांची अस्मिता आहे. कुठल्याही परिस्थितीत मराठी माणसांवर अन्याय होऊ देणार नाही असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानपरिषदेत केले. कल्याणमधील मराठी कुटुंबावर झालेल्या हल्ल्या प्रकरणी विधानपरिषद सदस्य ॲड. अनिल परब यांनी […]
– विविध मागण्यांसाठी हिवाळी अधिवेशनादरम्यान विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे नागपुरात धरणे आंदोलन नागपूर :- शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे प्रलंबित प्रश्न सभागृहात मांडून सोडविण्यासाठी पूर्णपणे कटिबद्ध असून, प्रश्नांवर ठोस तोडगा काढण्यासाठी प्रयत्न करू, अशी ग्वाही विमाशि संघाचे सरकार्यवाह तथा आमदार सुधाकर अडबाले यांनी आंदोलनाप्रसंगी दिली. राज्यातील खाजगी व स्थानिक स्वराज्य संस्थाअंतर्गत संचालित प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा व खाजगी अनुदानित […]
– ६३ सामाजिक बांधिलकीच्या रक्कम यांसह डिझज वरिल सरचार्ज व १७.५०टक्के प्रवास सरचार्ज कमी केल्यास भाडेवाढीची गरज नाही – एसटीची १४ टक्के भाडेवाढ करण्याचा प्रस्ताव शासनाकडे सादर काटोल/कोंढाळी :- बहुजन सुखाय,बहुजन हिताय असे ब्रिद वाक्य घेऊन प्रवासी सेवा देणार्या लाल परिला सद्ध्या तरी बरे दिवस आले आहेत. राज्य सरकारने लाडक्या बहिणींना लालपरितू प्रवासादरम्यान अर्धेच तिकीट भाडे द्यावे लागते. तर अर्धे […]