नागपूर :- पोलीस ठाणे कोतवाली हद्दीत गांधी गेट, शिवाजी महाराज पुतळया जवळ, कोतवाली पोलीस नाकाबंदी राबवीत असतांना एका ग्रे रंगाच्या अॅक्टीव्हा गाडी वरील दोन ईसमांवर संशय आल्याने त्यांना थांबवुन त्यांचे नाव विचारले असता, त्यांनी त्यांचे नावे १) राहीत गुलाबचंद कोरी वय ३० वर्ष रा. घर नं. ४२८, मदनमोहन मालवीया वार्ड, भर्तीपुर, जबलपूर २) संगम रघुवरप्रसाद कोरी वय २७ वर्ष रा. वनोदा, पनागर, जबलपूर असे सांगीतले. त्यांचे जवळील काळया रंगाच्या बॅगेची पाहणी केली असता, बॅगेमध्ये रोख २,६७,३००/- रू. मिळुन आले. दोघांनाही रकमेबाबत विचारपूस केली असता कोणतेही समाधानकारक उत्तरे दिली नाही. आरोपींचे ताब्यातुन नमुद रक्कम दोन मोवाईल फोन व अॅक्टीव्हा क. एम.एच ४९ वी.व्ही ६९८३ असा एकुण ४२,३७,३००/- रू. चा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पुढील कारवाई सुरू आहे.
वरील कामगिरी रविन्द्रकुमार सिंगल, पोलीस आयुक्त नागपूर शहर, निसार तांबोळी सह. पोलीस आयुक्त नागपूर शहर, प्रमोद शेवाळे अपर पोलीस आयुक्त (उत्तर प्रभाग) नागपूर शहर, महक स्वामी, पोलीस उप आयुक्त (परि. ३), श्वेता खाडे सहा. पो. आयुक्त लकडगंज विभाग, यांचे मार्गदर्शनाखाली, वपोनि. अतुल मोहनकर, पोउपनि बालाजी माने, विलास गोरे, पद्माकर कुमठकर, सफौ. वामन ठोंबरे, पोहवा, दापुरकर, ज्ञानेश्वर कोठे, धर्मपाल वर्मा, पोअ. चैत्तन उतखेडे, दिनेश दिहाडे, अमीत तिवारी, आशिष, विवेक व मपोहवा, कमल निकुरे व सोनाली यांनी केली.