राष्ट्रीय वनहुतात्मा दिनानिमित्त वनभवन येथे वनहुतात्मांना श्रध्दांजली

नागपूर :- वन आणि वन्यजीवांचे संरक्षण आणि संवर्धनाचे कर्तव्य बजावित असतांना हौतात्म्य प्राप्त झालेल्या वनाधिकारी आणि वन कर्मचारी यांच्या स्मरणार्थ 11 सप्टेंबर रोजी राष्ट्रीय वनहुतात्मा दिनाचे आयोजन वन विभागाचे राज्य मुख्यालय, वनभवन येथे करण्यात आले. राज्याचे प्रधान मुख्य वनसंरक्षक डॉ. वाय.एल.पी. राव यांच्या वनहुतात्म्यांना पुष्पचक्र अर्पण करुन श्रध्दांजली वाहण्यात आली.

11 सप्टेंबर हा दिवस भारतीय इतिहासात निसर्ग पूजक असलेल्या राजस्थानातील विष्णोई समुदायातील 363 व्यक्तींना खेजरली गावातील खेजडी वृक्षांना संरक्षणासाठी सन 1738  यावर्षी दिलेल्या अतुलनीय प्राण बलिदानासाठी ओळखला जातो. राज्यात सुध्दा वनविभागातील वनाधिकारी व कर्मचाऱ्यांनी वनसंरक्षणाची जबाबदारी पार पाडत असतांना त्यांच्या जीवाची पर्वा न करता त्यांचा देह धारातीर्थी ठेवला. त्यासर्वांच्या अतुलनीय बलिदानाच्या स्मरणार्थ वनविभागाच्या मुख्यालयी वनभवन येथे वनहुतात्मा स्मारक उभारण्यात आले आहे. यात रोजंदारी वनमजूर, वाहनचालक, वनरक्षक, वनपाल आणि वनपरिक्षेत्र अधिकारी यांचा समावेश आहे.

यावेळी उपस्थितांनी दोन मीनीट मौन पाळून तसेच स्मारकावर पुष्प वाहून वनहुतात्म्यांना भावपूर्ण श्रध्दांजली दिली. भारतीय वन सेवेतील वरिष्ठ अधिकारी व इतर अधिकारी, वनकर्मचारी मोठया संख्येने यावेळी उपस्थित होते.

 

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

धक्कादायक घटना...शिक्षकाकडून आदिवासी विद्यार्थ्यांला बेशुद्ध होयीपर्यत बेदम मारहाण..!

Wed Sep 14 , 2022
अमरदिप बडगे,प्रतिनिधी गोंदियातीलप्रसिद्ध प्रोग्रेसिव्ह इंटरनँशनल शाळेतील धक्कादायक प्रकार गोंदिया :- शारीरिक सरावादरम्यान सहाव्या वर्गात शिकणाऱ्या आदिवासी विद्यार्थ्यांला शिक्षकाने बेशुद्ध होई पर्यंत काठी आणि पाईपने बेदम मारल्याची धक्कादायक घटना गोंदियातील प्रसिद्ध प्रोग्रेसिव्ह शाळेत घडली आहे. तर या घटनेमुळे संतप्त पालकांनी आपला रोष शाळा व्यवस्थापनावर व्यक्त करीत. सदर शिक्षकासह शाळा व्यवस्थापनावर कारवाई करण्याची मागणी आदिवासी प्रकल्प अधिकारी यांचेकडे निवेदनातून केली आहे, तसेच […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com